घरताज्या घडामोडीनोकरी हवी ? येथे करा अर्ज

नोकरी हवी ? येथे करा अर्ज

Subscribe

करोना आणि लॉकडाऊनमुळे परप्रांतीय मजूरांनी आता त्यांच्या त्यांच्या गावाची वाट धरली आहे. त्यामुळे आता विविध ठिकाणी रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. औद्योगिक क्षेत्राला भेडसावणारी मजूर, कामगारांची कमतरता लक्षात घेता जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. २८ ते ३० मे दरम्यान ऑनलाईन पध्दतीने तरूणांना यात सहभागी होता येणार आहे. यात सहभागी उमेदवारांच्या मुलाखती सोशल मिडीयाव्दारे घेण्यात येणार आहे.

सध्या करोनाच्या प्रादुर्भावामुळे शासनाने जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे मागील काही दिवसांपासुन अनेक औद्योगिक आस्थापना, व्यवसाय व उद्योग हे बंद होते. त्यामुळे सदर आस्थापनांमध्ये काम करणारे बरेचसे परप्रांतीय कामगार, मजुर हे त्यांचे गावी परतत आहेत. लॉकडाउनच्या तिसरया टप्प्यात शासनाने काही अटी व शर्थींच्या अधिन राहुन कंपन्या औदयोगीक आस्थापना, व्यवसाय, उदयोग सुरु करण्यास मान्यता दिली आहे. बरयाचशा कंपन्यांमध्ये परप्रांतीय मजूर काम करतात. लॉकडाऊनमुळे हाताला काम नसल्याने हे सर्व मजूर आपापल्या मुळगावी परतत आहेत. काही कंपन्यांनी मजूरांना एक महीन्याचे वेतन देत त्यांच्या राहण्याची व्यवस्था केली अशा मजूरांना आता कंपन्या सुरू झाल्याने पुन्हा कामावर रूजू करून घेण्यात आले आहे मात्र इतर कंपन्यांना मात्र कामगारांची मोठी कमतरता भासत आहे. अशातच महराष्ट्र शासनानेही राज्यातील तरूणांनी आता पुढे यावे असे आवाहन केले आहे. औद्योगिक आस्थापनांना मनुष्यबळाची आणि स्थानिक बेरोजगार उमेदवारांना कामाची आवश्यकता असल्याचे जाणवत आहे. ही गरज लक्षात घेउन ऑनलाईन रोजगार मेळावा आयोजित करण्यात आल्याचे कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त संपत चाटे यांनी सांगितले.

- Advertisement -

असा करा अर्ज

या मेळाव्यात रोजगार देणा-या विविध नामांकित कंपन्या व नियोक्त्यांकडून रिक्तपदे www.rojgar.mahaswayam.gov.in या वेब पोर्टलवर ऑनलाईन अधिसूचित करण्यात येणार आहेत. यासाठी सदर वेबपोर्टलवर नोंदणी केलेल्या आणि रिक्तपदांसाठी पात्रतेप्रमाणे पात्रताधारक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज केलेल्या उमेदवारांच्या व्हिडीओ कॉन्फरन्स (Skype, Whatsapp,etc.) व्दारे मुलाखती घेण्यात येणार आहेत.

येथे करा नोंदणी

उमेदवारांनी अद्याप पर्यत सेवायोजन नोंदणी केली नसल्यास www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर किंवा अँड्रॉईड मोबाईलधारकांनी प्ले स्टोअरमधून mahaswayam मोफत अ‍ॅप डाऊनलोड करुन नोंदणी करावी, तसेच लॉगीन करुन शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्तपदांसाठी अर्ज करावा.

- Advertisement -

भरती इच्छुक नियोक्ते यांनी जास्तीत जास्त रिक्तपदे www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर पंडीत दिनदयाह उपाध्याय जॉब फेअर ऑप्शन वर क्लिक करुन नाशिक ऑनलाईन जॉब फेअर १ (2020-21) यावर त्यांचेकडील रिक्तपदे अधिसूचित करावी. तसेच मनुष्यबळाच्या मागणीची जाहिरात व प्रसिध्दी विभागाच्या वेबपोर्टलवर विनामुल्य करावी. याबाबत काही अडचण आल्यास सहाय्यासाठी कार्यालयाच्या 0253-2972121 या दूरध्वनीवर कार्यालयीन वेळेत संपर्क करावा.
सुनिल सैंदाणे, उपायुक्त.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -