घरदेश-विदेशमाझं नाव 'मतदान'!!

माझं नाव ‘मतदान’!!

Subscribe

मतदानाच्या दिवशी जन्म झाला म्हणून एका बाळाचं नाव मतदान ठेवण्यात आलं आहे.

मतदान हे निवडणुक प्रक्रियेतील महत्त्वाची प्रक्रिया. पण, तुम्हाला कुणी मुलाचं नाव ‘मतदान’ आहे असं सांगितलं तर तुमची प्रतिक्रिया काय असेल? आश्चर्य वाटलं? पण हो ‘मतदान’ हे एका नवजात बालकाचं नाव आहे. त्यामागील गोष्ट देखील रंजक आणि ‘एकदम कडक’ आहे. त्याचं झालं असं की, या मुलाचा जन्म मतदानाच्या दिवशी झाला म्हणून या मुलाचं नाव ‘मतदान’ ठेवलं गेलं आहे. मतदान नावाचं हे बाळ मध्यप्रदेशात जन्माला आहे आहे. काल अर्थात बुधवारी मध्यप्रदेशात विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान पार पडलं. देवास इथल्या मतदान केंद्रावर भल्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. त्यावेळी एका २६ वर्षीय तरूणाचं लक्ष सतत घडाळ्याकडे होतं. घड्याळाचे काटे पुढे सरकरत होते त्याप्रमाणे त्याच्या ह्रदयाचे ठोके देखील वाढत होते. कारण त्याची गरोदर पत्नी रूग्णालयात होती. आणि कोणत्याही क्षणी बाळाचा जन्म होणार होता. विशेष बाब म्हणजे संतोष हा रूग्णालयापासून तब्बल १२० किमी अंतरावर केवळ मतदानासाठी आला होता. पण, मतदानाचा हक्क बजावून जेव्हा संतोष रूग्णालयात पोहोचला तेव्हा त्याच्या पत्नीनं एका गोंडस बाळाला जन्म दिला होता. मतदानाच्या दिवशी बाळाचा जन्म झाल्यानं त्यानं नवजात बालकाचं नाव ‘मतदान’ असं ठेवलं. पण शाळेत किंवा सरकारी कार्यालयामध्ये भविष्यात काही अडचणी येणार असतील तर मी त्याचं नाव बदलण्याचा विचार करेन असं देखील यावेळी संतोषनं स्पष्ट केलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -