घरताज्या घडामोडी२० जूनपर्यंत चौकशी नको, राहुल गांधींची ईडीला पत्राद्वारे मागणी

२० जूनपर्यंत चौकशी नको, राहुल गांधींची ईडीला पत्राद्वारे मागणी

Subscribe

२० जूनपर्यंत चौकशी नको, अशी विनंती राहुल गांधी यांनी केल्याची माहिती सुत्रांकडून समोर आली आहे. दरम्यान, त्यांची ही मागणी मान्य होईल की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. सोमवार, मंगळवार, बुधवार असे सलग तीन दिवस ३० तास त्यांची चौकशी करण्यात आली. आज गुरुवारी त्यांची चौकशी झाली नसून उद्या चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे. मात्र, २० जूनपर्यंत चौकशी नको, अशी विनंती राहुल गांधी यांनी केल्याची माहिती सुत्रांकडून समोर आली आहे. दरम्यान, त्यांची ही मागणी मान्य होईल की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. (No inquiry till June 20, Rahul Gandhi’s demand to ED by letter)

हेही वाचा – काँग्रेसचं आंदोलन म्हणजे संविधानाचा अपमान, चंद्रकांत पाटलांची टीका

- Advertisement -

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी यांनी चौकशीपासून सवलत मिळावी याकरता ईडीला पत्र लिहिलं आहे. आईच्या आजाराचं कारण देत २० जूनपर्यंत चौकशी न करण्याची मागणी त्यांनी पत्राद्वारे ईडीला केली आहे. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातच त्यांची तब्येत खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तसेच, या प्रकरणात सोनिया गांधींचीही चौकशी केली जाणार असून २३ जून रोजी त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे.

हेही वाचा – राहुल गांधी हे देशाचा आवाज; सूडबुद्धीची कारवाई सहन करणार नाही : नाना पटोले

- Advertisement -

कार्यकर्ते देशभर आक्रमक

गेल्या तीन दिवसांपासून त्यांची सतत चौकशी सुरू असल्याने काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. आज, मुंबई काँग्रेसमार्फत मुंबईत जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी आक्रमक आंदोलकांना पोलिसांनी ताब्यातही घेतलं होतं. नाना पटोले यांच्या नेतृत्त्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं होतं, यावेळी बाळासाहेब थोरांतासह अनेक नेतेही उपस्थित होते.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -