घरदेश-विदेशकुणी लॉटरीचं तिकीट घेत नसल्याने स्वतःच घेतले तिकिट, रात्रीत झाला कोट्याधीश

कुणी लॉटरीचं तिकीट घेत नसल्याने स्वतःच घेतले तिकिट, रात्रीत झाला कोट्याधीश

Subscribe

सगळे टॅक्स कट होऊन मिळणार ७.५ करोड

आपण एक म्हण नेहमी ऐकतो की जब ऊपर वाला देता है तो छप्पर फाड कर देता आहे. म्हणजेच काय जेव्हा वरचा देतो तेव्हा भरभरुन देतो असे आपण नेहमी ऐकतो. असाच काहीसा प्रकार केरळमधील एका व्यक्तीसोबत घडला आहे. एका लॉटरी विक्रेत्याकडून कोणी लॉटरीचे तिकीट खरेदी करत नव्हते. त्यामुळे त्याने स्वतःच तिकीट खरेदी केले आणि तो रातोरात करोडपती झाला. केरळ सरकारने ख्रिसमस न्यू इयर बंपर लॉटरीचं निकाल जाहीर केला. यामध्ये शराफुद्दीनकडील तिकीटाचा नंबर लागला आणि शराफुद्दीनला १२ कोटींची लॉटरी लागली. लॉटरी लागलेल्या तरुणाचे नाव शराफुद्दीन आहे. सहा लोकांच्या परिवारासह शराफुद्दीन केरळमध्ये राहतो. शराफुद्दीन हा परदेशात कामाला होता. ९ वर्ष परदेशात काम केल्यावर भारतात परतला. भारतात आल्यावर तिकीट खरेदी आणि विक्रीचे काम सुरु केले.

मुलाखतीदरम्यान लॉटरी विजेता शराफुद्दीन याने म्हटले आहे की, जिंकलेल्या रकमेतून तो आधी आपल्यावरील कर्ज चुकवणार आहे. तर उरलेल्या पैशातून एखादा छोटा व्यवसाय सुरु करणार आहे. तसेच वाचलेल्या पैशातून एक छोटे घर बांधण्याची इच्छा त्याने व्यक्त केली आहे. शरफुद्दीनच्या परिवारात आई, दोन भाऊ, पत्नी आणि एक मुलगा आहे. शराफुद्दीन पहिले सौदी अरब येथे काम करत होता.

- Advertisement -

सगळे टॅक्स कट होऊन मिळणार ७.५ करोड

लॉटरी विजेत्या शराफुद्दीनने जिंकलेल्या रक्कमेतून ३० टक्के टॅक्स कट केला जाणार आहे. तर १० टक्के एजंट कमीशन कापण्यात येणार आहे. हे सर्व टॅक्स कापल्यानंतर शराफुद्दीनच्या हातात ७.५० करोड रुपये मिळणार आहेत. केरळ सरकारच्या ख्रिसमस न्यू इयर बम्बर लॉटरी कोड बीआर -७७ चा निकाल १७ जानेवारी २०२१ रोजी जाहीर झाला. प्रथम पारितोषिक १२ कोटी रुपये, दुसरे, तिसरे, चौथे आणि पाचवे बक्षीस अनुक्रमे ५० लाख रुपये, दहा लाख रुपये, पाच लाख रुपये आणि एक लाख रुपये असे होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -