घरदेश-विदेशक्वारंटाइन सेंटरमधील महिलेचा बनवला अश्लील व्हिडिओ; दोघांना अटक

क्वारंटाइन सेंटरमधील महिलेचा बनवला अश्लील व्हिडिओ; दोघांना अटक

Subscribe

मध्य प्रदेशमधील सागर जिल्ह्यातील एका क्वारंटाइन सेंटरमधील महिलेचा अश्लील व्हिडिओ बनवत तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केली. तिने नकार दिल्यानंतर व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली.

मध्य प्रदेशमधील सागर जिल्ह्यातील कुमेरिया भटौलीमध्ये शासकीय प्राथमिक शाळेत क्लारंटाइन असलेल्या दोन तरुणांनी एका २३ वर्षीय मुलीचा अश्लील व्हिडिओ बनवला. आरोपींनी व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत ​​तिच्यावर शरीर सुखाची मागणी केली. पिडीत महिलेने मंगळवारी रात्री उशिरा गडकोटा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी क्वारंटाइन सेंटरमध्ये नव्हते. त्यांनी गुप्तपणे क्वारंटाइन सेंटरमध्ये जाऊन हा व्हिडिओ केला.

प्रभारी पोलिस अधिकारी राजेश बंजारा यांनी सांगितलं की, पिडीत मुलगी दमोह जिल्ह्यातील आहे. ती इंदूर येथे मजूर म्हणून काम करते. मावस बहिणीसोबत ती आपल्या गावी आली होती. बहिणीच्या सांगण्यावरून ती कुमरिया भटौली गावात क्वारंटाइन सेंटरमध्ये क्वारंटाइन झाली.

- Advertisement -

हेही वाचा – नेपाळची उभारणी भारताने केली; नेपाळच्या नव्या नकाशावरुन भारताने खडसावलं


तीन-चार दिवसांपूर्वी रोजगार सहाय्यकाचे भाऊ सुनील लाडिया आणि लक्ष्मण लाडिया यांनी शाळेच्या आवारात तात्पुरत्या बांधण्यात आलेल्या स्नानगृहातील मुलीचे अश्लील व्हिडिओ बनवले. दोघांनीही त्या महिलेला व्हिडिओविषयी माहिती दिली आणि शारीरिक संबंध ठेवण्यासाठी तिच्यावर दबाव आणण्यास सुरुवात केली. मात्र नकार दिल्याने त्यांनी व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. महिलेच्या तक्रारीवरून दोन्ही आरोपींविरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला. दोन्ही आरोपी कुमेरिया भटौलीमधील रहिवाशी आहेत. दोघांना अटक करण्यात आली आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -