घरदेश-विदेशचीन आणि युरोपमध्ये हाहाकार माजल्यानंतर भारतात येणार का कोरोनाची चौथी लाट, तज्ज्ञ...

चीन आणि युरोपमध्ये हाहाकार माजल्यानंतर भारतात येणार का कोरोनाची चौथी लाट, तज्ज्ञ म्हणतात…

Subscribe

सध्या देशात काही दिवसांपासून संसर्गाच्या दैनंदिन रुग्णांची संख्या सातत्याने कमी आहे. प्रसिद्ध व्हायरोलॉजिस्ट आणि ख्रिश्चन मेडिकल कॉलेज (सीएमसी) वेल्लोर येथील माजी प्राध्यापक डॉ. टी. जेकब जान म्हणाले की, कोरोना महामारीच्या चौथ्या लाटेच्या येण्याची शक्यता खूपच धूसर आहे.

नवी दिल्ली : Omicron च्या BA2 उप-प्रकारामुळे दक्षिण कोरिया, ब्रिटन आणि युरोपातील अनेक देशांमध्ये कोरोना विषाणू संसर्गाच्या प्रकरणांमध्ये वाढ झालीय. तर भारतातील परिस्थिती पाहिल्यास येथील चौथ्या लाटेबाबत तज्ज्ञ फारसे चिंतीत दिसत नाहीत. कोरोनाच्या चौथ्या लाटेची भीती नसून, त्यासाठी लसीकरण आणि प्रतिकारशक्ती यासह अनेक कारणे असल्याचं तज्ज्ञ सांगत आहेत. सध्या देशात काही दिवसांपासून संसर्गाच्या दैनंदिन रुग्णांची संख्या सातत्याने कमी आहे. प्रसिद्ध व्हायरोलॉजिस्ट आणि ख्रिश्चन मेडिकल कॉलेज (सीएमसी) वेल्लोर येथील माजी प्राध्यापक डॉ. टी. जेकब जान म्हणाले की, कोरोना महामारीच्या चौथ्या लाटेच्या येण्याची शक्यता खूपच धूसर आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेशी विशेष संवाद साधताना डॉ. जान म्हणाले की, सध्या कोणतीही वैज्ञानिक किंवा महामारीशास्त्रीय कारणे दिसत नाहीत, त्यामुळे कोरोना महामारीची चौथी लाट येईल, असे म्हणता येणार नाही. पण ती येणार नाही, याचा अंदाज कोणी बांधू शकत नाही. जरी चौथ्या लाटेची शक्यता खूपच कमी असली तरी आपण सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. व्हायरस आणि त्यातील बदलांवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे.

- Advertisement -

नमुन्यांचे जीनोम सिक्वेन्सिंग करत राहणे आवश्यक

प्रोफेसर डॉ. टी. जेकब जान म्हणाले की, नमुन्यांचे जीनोम सिक्वेन्सिंग करत राहणे देखील आवश्यक आहे, जेणेकरून नवीन प्रकारांच्या उदयाची माहिती वेळेत मिळू शकेल. ओमिक्रॉनच्या प्रकरणांमध्ये स्थानिक पातळीवर वाढ होत नाही ना, हेही पाहावे लागेल. केंद्राने राज्यांना सतर्कतेच्या सूचना केल्या आहेत. या आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांची कोरोना चाचणी करावी आणि संसर्ग आढळल्यास त्यांच्या नमुन्यांची जीनोम सिक्वेन्सिंग देखील केली जावी.

आरोग्य सचिवांचा कोरोनाबाबत राज्यांना इशारा

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कोरोनाबाबत सतर्क राहण्यास सांगितले आहे. आग्नेय आशियाई देश आणि युरोपीय देशांमध्ये वाढत्या कोरोना प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर हे सावधगिरीचे मेसेज पाठवण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, भूषण यांनी राज्यांच्या मुख्य सचिवांना आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रशासकांना पत्र पाठवले आहे. या पत्रात म्हटले आहे की, वाढत्या आर्थिक आणि इतर सार्वजनिक उपक्रमांमुळे कोरोनाच्या बाबतीत सावधगिरी बाळगणे तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे लोकांना कोरोनाशी संबंधित नियम आणि उपाययोजनांबाबत जागरूक करून नियम पाळण्यास सांगा.

- Advertisement -

भारतात कोरोनाचे रुग्ण सातत्याने कमी होतायत

भारतात रविवारी 1,761 प्रकरणे आणि 127 मृत्यूची नोंद झाली. आतापर्यंत देशात कोरोनाविरुद्ध लसीचे 1,81,21,11,675 डोस देण्यात आलेत. त्याचा परिणाम कोविड संसर्ग दरावरही दिसून येत आहे. भारतात सध्या कोरोनाचे 26,240 सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत देशात कोविड 19 चे 4,30,07,841 रुग्ण आढळले आहेत. त्याच वेळी कोरोनाने 5,16,479 लोकांचा बळी घेतला आहे. 4,24,65,122 प्रकरणांमध्ये रिकव्हरीही झाली आहे. 27 मार्चपासून देशात आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू होणार आहेत.


हेही वाचाः India Corona Update Today: देशात नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत आजही घट! 24 तासांत 1761 नव्या रुग्णांची नोंद

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -