घरCORONA UPDATEomicron- भारतात सौम्य संसर्गाद्वारे होणार ओमीक्रॉनचा प्रसार, पण लस न घेणाऱ्यांसाठी धोकादायक

omicron- भारतात सौम्य संसर्गाद्वारे होणार ओमीक्रॉनचा प्रसार, पण लस न घेणाऱ्यांसाठी धोकादायक

Subscribe

जगभरात धुमाकूळ घालणारा कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमीक्रॉनने भारतातही हात पाय पसरण्यास सुरुवात केली आहे. यामुळे पुन्हा एकदा देशात भीतीचे वातावरण पसरले आहे. याचपार्श्वभूमीवर, सर्वप्रथम ओमीक्रॉनचा शोध लावणाऱ्या ड़ॉक्टर अँजेलिक कोएत्झी ( Dr Angelique Coetzee)   यांनी मात्र लसीकरण झालेल्या देशांसाठी ओमीक्रॉन धोकादायक नसून तेथे त्याचा संसर्ग सौम्य स्वरुपाचा असेल असा दावा केला आहे. पण त्याचबरोबर ज्यांनी लसच घेतल्या नाहीत त्यांच्यासाठी मात्र ओमीक्रॉन जीवघेणा ठरु शकतो असा इशाराही त्यांनी दिला आहे. यामुळे शंभर कोटी लसीकरण झालेल्यां भारतीयांना मात्र या दाव्यामुळे दिलासा मिळाला आहे.

पीटीआयबरोबर बोलताना डॉक्टर कोएत्झी ( Dr Angelique Coetzee)   यांनी ओमीक्रॉनच्या संसर्गाबद्दल माहिती दिली. त्या म्हणाल्या की लसीकरण झालेल्या किंवा कोरोनातून बरे झालेल्या व्यक्तींना ओमीक्रॉनचा संसर्ग सौम्य स्वरुपाचा असेल. पण ज्यांनी लसच घेतलेली नाही अशा व्यक्ती मात्र ओमीक्रॉनचा मोठया प्रमाणावर संसर्ग पसरवण्याचे काम करतील. तसेच कोरोना महामारी अजून संपलेली नसून येत्या काही दिवसात ती एंडेमिक स्टेजवर येणार आहे. एंडेमिक ही अशी अवस्था असते जेव्हा व्हायरस आणि त्यापासून झालेले आजार कायमस्वरुपी अस्तित्वात राहतात. असेही  कोएत्झी यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केले्या डेटानुसार शनिवारपर्यंत भारतात ४१५ ओमीक्रॉन बाधितांची नोंद झाली होती. त्यातील ११५ रुग्ण बरे झाले असून काहीजण अद्याप विलगीकरणात आहेत. तर दुसरीकडे ओमीक्रॉनच्या संसर्गाचा धोका तरुण आणि लहान मुलांमध्ये सर्वाधिक असल्याचे कोएत्झी यांनी सांगितले आहे. ओमीक्रॉन हा धोकादायक जरी नसला तरी त्याचा संसर्गवेग अधिक आहे. हा व्हायरस माणसांना संसर्ग देऊन त्यांच्यात जिवंत राहतो . पण रुग्ण ५ ते ६ दिवसात यातून बरे होत आहेत. पण तरीही ओमीक्रॉन जर म्युटेंट झाला तर तो कदाचित माणसासाठी कर्दनकाळ ठरु शकतो अशी शक्यताही कोएत्झी( Dr Angelique Coetzee)  यांनी व्यक्त केली आहे.

 

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -