घरCORONA UPDATEMumbai Corona Update: मुंबईत आज कोरोनाचे १,२५७ नवे रुग्ण, तर ५५ जणांचा...

Mumbai Corona Update: मुंबईत आज कोरोनाचे १,२५७ नवे रुग्ण, तर ५५ जणांचा मृत्यू

Subscribe

आज दिवसभरात मुंबईमध्ये १ हजार ९८४ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे

राज्यभरासह मुंबईतही कोरोनाचा कहर सुरू असून मुंबईत आज १ हजार २५७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आल्याने कोरोनाबाधितांची संख्या १ लाख ०५ हजार ८२९ वर पोहचली आहे. तर ५५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ५ हजार ९२७ वर पोहचला आहे. तर आज दिवसभरात मुंबईमध्ये १ हजार ९८४ रूग्णांनी कोरोनावर मात केली असून आतापर्यंत मुंबईत ७७ हजार १०२ रूग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

- Advertisement -

मुंबईत आज दिवसभरात ५५ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये ३८ पुरुष तर १७ महिलांचा समावेश आहे. मृतांमधील ५ जणांचे वय ४० वर्षांखाली आहे. ३६ जण हे ६० वर्षांवरील, तर १४ जण हे ४० ते ६० वर्षादरम्यान होते.

मुंबईत कोरोनाचे ८८६ संशयित रुग्ण सापडल्याने मुंबईतील संशयित कोरोना रुग्णांची संख्या ७३ हजार ८७३ वर पोहोचली आहे. तसेच १ हजार ९८४ रुग्णांना घरी सोडण्यात आल्याने आतापर्यंत मुंबईतून तब्बल ७७ हजार १०२ जणांना घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली आहे.


Coronavirus Maharashtra: राज्यात २४ तासांत तब्बल ९८९५ नवे रूग्ण; २९८ मृत्यू

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -