घरमनोरंजनSushant Suicide Case : लेखक-दिग्दर्शक रुमी जाफरी यांची चौकशी

Sushant Suicide Case : लेखक-दिग्दर्शक रुमी जाफरी यांची चौकशी

Subscribe

सिनेअभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी बॉलीडचे प्रसिद्ध लेखक आणि दिग्दर्शक रुमी जाफरी यांची वांद्रे पोलिसांनी चौकशी केली. या चौकशीनंतर त्यांची जबानी नोंदवण्यात आली आहे. याच प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी ४० हून अधिक लोकांची चौकशी करून त्यांची जबानी नोंदवून घेतली आहे. सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सध्या अंतिम टप्प्यात असून त्याचा त्याचा अहवाल वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांसह गृहविभागाला सादर केला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा – पाकिस्तानने कुलभूषण जाधवच्या मदतीचे मार्ग रोखले – परराष्ट्र मंत्रालय

१४ जूनला सुशांतने त्याच्या वांद्रे येथील राहत्या घरी आत्महत्या केली होती. नैराश्यातून त्याने आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. मात्र या आत्महत्येमागे बॉलीवूडमधील घराणेशाही आणि गटबाजी कारणीभूत आहे का याचा आता पोलिसांकडून तपास सुरू आहे. अलीकडेच रुमी जाफरी यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजाविण्यात आले होते. त्यानंतर रुमी जाफरी हे गुरुवारी चौकशीसाठी वांद्रे पोलीस ठाण्यात हजर झाले होते. यावेळी त्यांची विविध प्रश्नावर मते जाणून घेण्यात आली. जबानीनंतर त्यांना सोडून देण्यात आले. याच प्रकरणात आतापर्यंत ४० हून अधिक लोकांची पोलिसांनी जबानी नोंदवली आहे. त्यात सुशांतचा स्वयपाकी निरज सिंग, घरगडी केशव बच्चानार, मॅनेजर दिपेश सावंत, क्रिएटिव्ह मॅनेजर सिद्धार्थ राममूर्ती पिठानी, बहिण नितू सिंग, मितू सिंग, वडिल के. के. सिंग, अभिनेता महेश शेट्टी, कास्टिंग दिग्दर्शक मुकेश छाब्रा, व्यावसायिक मॅनेजर श्रृती मोदी, पीआर मॅनेजर अंकिता तेहलानी, अभिनेत्री रिया चक्रवर्ती, सिनेदिग्दर्शक संजय लिला भन्साली, यशराज फिल्मचे अध्यक्ष आणि निर्माता आदित्य चौपडा, तीन पत्रकार, तीन मनोचिकित्सकासह एका मानसशास्त्रज्ञाचा समावेश आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -