घरताज्या घडामोडीभयंकर! दिल्लीतील शेतकरी आंदोलनात फुकट चिकन न दिल्याने निहंगने मजुराचे तोडले पाय

भयंकर! दिल्लीतील शेतकरी आंदोलनात फुकट चिकन न दिल्याने निहंगने मजुराचे तोडले पाय

Subscribe

गेल्या अनेक महिन्यांपासून दिल्ली-हरयाणाच्या सिंघू बॉर्डवर शेतकऱ्यांचे कृषी कायद्यांविरोधात आंदोलन सुरू आहे. तर एकीकडे या सिंघू बॉर्डवर भयंकर प्रकार घडताना दिसत आहेत. पुन्हा एकदा निहंगने एका व्यक्तीला मारहाण केली आहे. मोफत चिकन (कोंबडा) न दिल्यामुळे मनोज पासवान नावाच्या एका मजुराचे पाय तोडल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. मनोज बिहारचा राहणारा असून अनेक वर्षांपासून मजदूरी करत आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी निहंगला अटक केली आहे.

माहितीनुसार, जेव्हा पीडित मनोज पासवान आंदोलन स्थळावरून रिक्षा घेऊन जात होता, तेव्हा निहंगने त्याचा रस्ता अडवला. त्याच्याकडून मोफत चिकन मागितले. यावेळी मनोजने निहंगला चिकन देण्यास नकार दिला. त्यामुळे निहंगने त्याला मारहाण करून त्याचे पाय तोडले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन गंभीर जखमी झालेल्या मजुराला रुग्णालयात दाखल केले.

- Advertisement -

दरम्यान काही दिवसांपूर्वी दिल्लीच्या सिंघू बोर्डवरती निहंगांनी एक मजूर लखबीर सिंहला मारहाण करून त्याची हत्या केली होती. त्याचे हात आणि पाय तोटले होते. लखबीरवर गुरु ग्रंथ साहिबचे अपमान केल्याचा आरोप निहंगांनी लावला होती. याप्रकरणी सोनीपत पोलीस आज चार आरोपी सरबजीत, गोविंद, भगवंत आणि नारायण सिंहला कोर्टात हजर करण्यात आहेत. याप्रकरणी सरबजीतला ७ दिवसांची कोठडी दिली होती तर उर्वरित ३ जणांचा ६ दिवसांची कोठडी दिली होती. आज या सर्व आरोपींच्या कोठडीचा कालावधी संपत असल्यामुळे यांना कोर्टात हजर केले जाणार आहे. यामुळे सोनीपत कोर्टात सुरक्षा वाढवली आहे.

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -