घरदेश-विदेशसंसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाचा वाद शिगेला, 'या' विरोधी पक्षांचा कार्यक्रमावर बहिष्कार

संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाचा वाद शिगेला, ‘या’ विरोधी पक्षांचा कार्यक्रमावर बहिष्कार

Subscribe

नव्या संसद भवनाचे म्हणजेच आत्मनिर्भर भारताचं प्रतिक असणाऱ्या नवी दिल्लीतील सेन्ट्रल व्हिस्टा विकास प्रकल्पांतर्गत नव्या संसद भवनाच्या इमारतीचे येत्या 28 मेला उद्घाटन होणार आहे. पण देशातील 19 विरोधी पक्षांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न असलेल्या नव्या संसद भवनाचे म्हणजेच आत्मनिर्भर भारताचं प्रतिक असणाऱ्या नवी दिल्लीतील सेन्ट्रल व्हिस्टा विकास प्रकल्पांतर्गत नव्या संसद भवनाच्या इमारतीचे येत्या 28 मेला उद्घाटन होणार आहे. यासाठी भव्य अशा उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. पण कार्यक्रमाला विरोधी पक्षांनी विरोध करण्यास सुरुवात केली आहे. देशातील 19 विरोधी पक्षांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. (Opposition parties boycott the inauguration of the new Parliament building)

हेही वाचा – काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांचं वादग्रस्त वक्तव्य; पंतप्रधानांना म्हटलं…

- Advertisement -

देशातील 19 विरोधी पक्षांनी संयुक्त निवेदन जारी करून नवीन संसद भवनाच्या उद्घाटनावर बहिष्कार टाकला असल्याचे सांगितले आहे. लोकशाहीचा आत्मा संसदेतूनच बाहेर फेकला गेला असल्याने नवीन इमारतीला कोणतेही महत्त्व उरले नसल्याचे या निवेदनातून सांगण्यात आले आहे.

तर नव्या संसद भवनाच्या उद्घाटनावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने बहिष्कार टाकला आहे. याबाबतची माहिती ठाकरे गटाचे प्रमुख प्रवक्ते संजय राऊत यांनी दिलीच. 28 मे रोजी संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनावर सर्व विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला असून आम्ही त्यामध्ये सहभागी असल्याचे संजय राऊत यांच्याकडून सांगण्यात आले.

- Advertisement -

याशिवाय द्रविड मुन्नेत्र कळघम (डीएमके) नवीन संसद भवनाच्या उद्घाटनावर बहिष्कार टाकणार असल्याची माहिती समोर आली आहे. डीएमकेचे खासदार तिरुची शिवा यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, द्रमुक उद्घाटन समारंभाला उपस्थित राहणार नाही.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यक्रमावर बहिष्कार
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (NCP)देखील नवीन संसद इमारतीच्या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहणार नसल्याचे सांगितले आहे. हा निर्णय इतर विरोधी पक्षांच्या समन्वयाने घेण्यात आला आहे. अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून देण्यात आली आहे.

‘या’ पक्षांनी कार्यक्रमावर टाकला बहिष्कार
नवीन संसद भवनाच्या उद्घाटन समारंभावर बहिष्कार टाकण्याची घोषणा करणाऱ्या पक्षांमध्ये काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल (आरजेडी), उद्धव ठाकरे गट, द्रमुक, राष्ट्रवादी काँग्रेस, आम आदमी पार्टी, समाजवादी पार्टी, सीपीआय, झारखंड मुक्ती मोर्चा यांचा समावेश आहे. तसेच, केरळ काँग्रेस, राष्ट्रीय लोक दल, टीएमसी, जेडीयू, सीपीआय (एम), इंडियन युनियन मुस्लिम लीग, नॅशनल कॉन्फरन्ससह आरएसपी या पक्षांनी देखील या भव्य सोहळ्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -