घरदेश-विदेश'ओरल सेक्स अनैसर्गिक', महिलेची सुप्रीम कोर्टात धाव

‘ओरल सेक्स अनैसर्गिक’, महिलेची सुप्रीम कोर्टात धाव

Subscribe

२००२ साली पीडित महिलेचा साखरपूडा झाला. त्यावेळी ती केवळ १५ वर्षांची होती. २०१४ साली तिचे लग्न झाले. तिचा पती डॉक्टर असून तो तिला तिची इच्छा नसतानाही ओरल सेक्स करायला भाग पाडतो

वैवाहिक बलात्कारासंदर्भातील सुनावणी सध्या दिल्ली हायकोर्टात सुरु आहे. तर सुप्रीम कोर्टात सध्या समलिंगी संबंधांना गुन्हा मानणारे कलम ३७७ रद्द करण्याच्या मागणीवरील सुनावणी सुरु आहे. या दोन्ही याचिका संदर्भातील निर्णय दिल्ली कोर्ट आणि सुप्रीम कोर्टाने राखून ठेवलेला असताना आता आणखी एक प्रकरण सुप्रीम कोर्टात आले आहे. ‘ओरल सेक्स’साठी बळजबरी केली म्हणून पतीविरोधात अनैसर्गिक सेक्सचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी करत पीडित महिलेने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.

नेमकी काय आहे महिलेची तक्रार ?

२००२ साली पीडित महिलेचा साखरपुडा झाला. त्यावेळी ती केवळ १५ वर्षांची होती. २०१४ साली तिचे लग्न झाले. तिचा पती डॉक्टर असून तो तिला तिची इच्छा नसतानाही ओरल आणि अेनेल सेक्स करायला भाग पाडतो, असा तिचा आरोप आहे. या प्रकरणी तिने पतीवर बलात्कार आणि अनैसर्गिक सेक्ससंदर्भात तक्रार दाखल केली होती. त्यावेळी वैवाहिक बलात्कारासंबंधी कलम ३७५ अंतर्गत कसलीही तरतूद नसल्याचे गुजरात हायकोर्टाने स्पष्ट केले होते. त्यानंतर ३७७ अंतर्गत पतीला शिक्षा व्हावी अशी मागणी केली होती. पण ती देखील नाकारण्यात आली होती. अखेर तिने सुप्रीम कोर्टाचे दार ठोठावले.

- Advertisement -
वाचा- ‘लग्नानंतर शरीरसंबधासाठी नकार देण्याचा दोघांनाही अधिकार’

सेक्सचे करायचा रेकॉर्डिंग

पीडित महिलेने या पतीसंदर्भात आणखी काही गोष्टींचा खुलासा केला आहे. तिने कोर्टासमोर सांगितले की, तिचा डॉक्टरपती तिच्या मनाविरोधात ओरल सेक्स करायला भाग पाडतो. शिवाय याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करतो. जर या गोष्टीला विरोध केला तर तो मारहाण करतो, अशा पद्धतीने अनैसर्गिक शरीरसंबंध हा गुन्हाच असे देखील तिने कोर्टात सांगितले.न्यायमूर्ती एन. व्ही. रामना आणि एम. एम. शांतनागौदर यांच्या खंडपीठापुढे या संदर्भात सुनावणी झाली.

काय आहे कलम ३७५?

कलम ३७५ अंतर्गत बलात्काराची व्याख्या निश्चित करण्यात आली आहे. या कलमांतर्गत महिलेवर बळजबरी करुन तिच्यावर लैंगिक छळ केल्यास यांतर्गत गुन्हा दाखल केला जातो. १५ वर्षावरील विवाहित महिलेवरील लैंगिक अत्याचार हा बलात्कार नाही, असे देखील या कलमात स्पष्ट करण्यात आले आहे.

- Advertisement -

काय आहे कलम ३७७?

protest_again_377
कलम ३७७ला विरोध करत आंदोलन करताना (फाईल फोटो)

कलम ३७७ अंतर्गत अनैसर्गिक संबंधांना गुन्हा ठरवण्यात आले आहे. शरीरसंबंधाच्या व्याख्येशिवाय प्रस्थापित केलेले शरीरसंबंध हे कायद्याने गुन्हा ठरवण्यात आले आहे ( या कायद्यामुळे समलिंगी संबंध हा देशात गुन्हा मानला गेला आहे.)

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -