घरदेश-विदेशATM मधून १० हजारांपेक्षा अधिक रकमेसाठी OTP बंधनकारक

ATM मधून १० हजारांपेक्षा अधिक रकमेसाठी OTP बंधनकारक

Subscribe

इतर बँकादेखील कॅनरा बँकेप्रमाणेच हा ओटीपीचा नियम करण्याची शक्यता

वारंवार होणारे एटीएमच्या माध्यमातील गुन्ह्यांवर आळा घालण्याकरिता बँकांनी देखील आपली पावले उचलली आहेत. गेल्या काही महिन्यापासून एटीएम संदर्भातील अनेक फसवणुकीच्या घटना वाढताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेकडून सर्वच बँकेना योग्य ती पावले उचलण्याचे आदेश दिले आहेत.

रक्कम काढताना पासवर्डसोबत ओटीपी क्रमांक आवश्यक

त्यामुळे आता कॅनरा बँकेने एटीएममधून कार्डद्वारे १० हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम काढताना ग्राहकांना ओटीपी बंधनकारक केला आहे. याचाच अर्थ जर तुम्हाला एटीएममधून १० हजारांपेक्षा अधिक रक्कम काढायची असल्यास तुम्हाला मोबाईलवर मिळणाऱ्या ओटीपीची आवश्यकता आहे. म्हणजेच यापुढे रक्कम काढताना पासवर्डसोबत ओटीपी क्रमांक हा अनिवार्य असणार आहे.

- Advertisement -

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे निर्देश

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितल्यानुसार, एटीएममधून फसवणुकीचे प्रकार हे रात्री ११ ते सकाळी ६ च्या दरम्यान अधिक होतात. रिझर्व्ह बँकेच्या सर्व आदेशांचे आम्हाला पालन करावे लागणार आहे. त्यामुळे, आता इतर बँकादेखील कॅनरा बँकेप्रमाणेच हा ओटीपीचा नियम करण्याची शक्यता आहे.

दिल्ली स्टेट लेव्हल बँकर्स कमिटीने एटीएममधील फसवणुकीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी अनेक उपाय सुचविले आहेत. यामध्ये एटीएमच्या दोन व्यवहारा दरम्यानचा असणारा कालावधी हा ६ ते १२ तासांचा असावा, असा पर्याय देखील होता. दरम्यान, २०१८-१९ मध्ये दिल्लीत एटीएममधून फसवणुकीच्या १७९ घटना समोर आल्या होती. तर महाराष्ट्रातूनही २३३ घटना समोर आल्या होत्या. त्यामुळे ATM मधून १० हजारांपेक्षा अधिक रकमेसाठी OTP अनिवार्य करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -