घरदेश-विदेशरेल्वे नोकर भरती म्हणजे मोदींचा नवीन जुमला

रेल्वे नोकर भरती म्हणजे मोदींचा नवीन जुमला

Subscribe

काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिंदबरम यांनी मोदी सरकारवर पुन्हा निशाणा साधला आहे. रेल्वेची नोकर भरतीवरून काँग्रेसने मोदी सरकारवर निशाना साधला आहे.

काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी मोदी सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. चिदंबरम यांनी रेल्वे भरतीच्या मुद्द्यावरून नरेंद्र मोदी यांना खडे बोल सुनावले आहे. भारतीय रेल्वे सेवेमध्ये येत्या दोन वर्षांमध्ये एकूण चार लाख पदांची भरती केली जाणार असल्याची घोषणा रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी केली होती. पियुष गोयल यांनी बुधवारी ही घोषणा केली होती. ही घोषणा म्हणजे निवडणुकीच्या तोंडावर ‘आणखी एक जुमला’ असल्याचे चिदंबरम यांनी सांगितले आहे. पाच वर्ष शांत बसलेल्या या सरकारला अचानक रिक्तपदं भरण्यासाठी आता जाग आली,असा खोचक टोलादेखील चिदंबरम यांनी दिला. चिदंबरम यांनी ट्विटरवरून ही टीका केली आहे.

- Advertisement -

काय म्हणालेत चिदंबरम

“रेल्वेमध्ये जवळपास पाच वर्षांपासून २ लाख ८२ हजार ९७६ पदं रिक्त आहेत. सरकार आता अचानक झोपेतून जागे झाले आहेत. तीन महिन्यांमध्ये या रिक्त पदांची भरती करणार असल्याची घोषणा सरकारने केली आहे. कित्येक सरकारी विभागांमध्ये हीच परिस्थिती आहे. एकीकडे सरकारी विभागांमध्ये मोठ्या प्रमाणात पदं रिक्त आहेत. आणि दुसरीकडे तरुणवर्ग बेरोजगार आहे.” – काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -