घरदेश-विदेशPadma Awards 2020 : 'मी पद्म पुरस्कारासाठी पात्र नाही', आनंद महिंद्रांची ह्रदयस्पर्शी...

Padma Awards 2020 : ‘मी पद्म पुरस्कारासाठी पात्र नाही’, आनंद महिंद्रांची ह्रदयस्पर्शी ट्विटर पोस्ट

Subscribe

देशातील प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांना व्यापार आणि उद्योग क्षेत्रातील योगदान आणि कार्यासाठी भारतातील तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मभूषण देऊन सन्मानित करण्यात आले आहे. मात्र आनंद महिंद्रा यांनी या पुरस्कारासाठी आपण पात्र नसल्याचे मत व्यक्त केले आहे. आनंद महिंद्रा यांनी यासंदर्भात एक ह्रदयस्पर्शी ट्विटर पोस्ट केली आहे. महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रांनी प्रतिष्ठित पुरस्काराबद्दल ट्विटरवर पोस्ट करत लिहिले की, इतर पुरस्कार प्राप्तकर्त्यांच्या तुलनेत मी स्वत:ला खरोखर अयोग्य समजतोय. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आनंद महिंद्रा यांना नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

पुरस्कार निवडीच्या बदलत्या पद्धतीचे केले कौतुक


उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी पद्म पुरस्कारांसाठी लोकांची निवड करण्याच्या पद्धतीत दीर्घकालीन बदल घडवून आणल्याबद्दल सरकारचे आभार मानले. यावर समाज सुधारणेसाठी महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या लोकांमध्ये असण्याची माझी पात्रता नाही. असं ह्रदयाला स्पर्श करणारे परखड ट्विट आनंद महिंद्र यांनी केले आहे.

- Advertisement -

आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर पद्म पुरस्कारांबद्दल सरकारचे कौतुक केले आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहिले की, या सरकारने पद्म पुरस्कार विजेत्यांच्या बाबतीत अतिशय महत्त्वाचे बदल केले आहेत. आता प्रामुख्याने तळागाळातील समाजाच्या सुधारणेत मूलभूत योगदान देणाऱ्या व्यक्तींवर लक्ष केंद्रीत केले जात आहे. त्यामुळे माझे नाव या श्रेणीत येण्यासाठी खरोखर अयोग्य असल्याचे मला वाटते. असंही आनंद महिंद्रा यांनी लिहिलेय.

- Advertisement -

महिंद्रांनी कर्नाटकातील पर्यावरणवादी आणि पद्मश्री विजेत्या तुलसी गौडा यांच्याबद्दल राष्ट्रपतींच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून शेअर केलेली पोस्ट रिट्विट केली आहे. पर्यावरणवादी गौडा यांनी ३०००० हून अधिक रोपे लावली असून ती वनविभागाच्या रोपवाटिकेमध्ये देखभाल केली जात आहे. ७७ वर्षांच्या गौडा सहा दशकांहून अधिक काळ पर्यावरण संरक्षण कार्यात सहभागी आहेत.

या पोस्टवर १५,००० हून अधिक लाईक्स मिळाल्या आहेत. तर अनेकांनी यावर आपले विचार व्यक्त केले आहेत. यासोबतच आनंद महिंद्रा यांनी अभिनंदन करणाऱ्यांचे आभार मानले आहेत शिवाय पद्मभूषण पुरस्कारासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. अनेक चाहते आनंद महिंद्राच्या नम्रतेचे कौतुक करत आहेत.

यंदाच्या पद्म पुरस्कारांच्या यादीत एकीकडे जॉर्ज फर्नांडिस, अरुण जेटली, सुषमा स्वराज, कंगना रनौत, एमसी मेरी कोम, आनंद महिंद्रा, पीव्ही सिंधू यांसारऱ्या बड्या व्यक्ती होत्या, तर दुसरीकडे संत्रा विक्रेते हरेकला हजब्बा, सायकल मेकॅनिक मोहम्मद शरीफ. अब्दुल जब्बार खान, लीला जोशो, तुलसी गौडा, राहीबाई सोमा पोपरे यांसारखे असामान्य कार्य करणारे सामान्य लोकही सामील होते.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -