घरट्रेंडिंगRiyaz Bhati : अंडरवर्ल्ड कनेक्शन असलेला कोण आहे रियाज भाटी ?

Riyaz Bhati : अंडरवर्ल्ड कनेक्शन असलेला कोण आहे रियाज भाटी ?

Subscribe

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा अतिशय जवळच्या समजल्या जाणाऱ्या रियाज भाटीचे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत असणारे कनेक्शन आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी उघड केले. रियाज भाटी हा तपास यंत्रणांना हवा आहे. गेल्या काही दिवसांपासून रियाज भाटी गायब आहे. याआधी रियाज भाटीला बनावट पासपोर्ट प्रकरणात अटक करण्यात आली होती. अवघ्या दोन दिवसात रियाज भाटी कसा काय सुटतो असा सवाल नवाब मलिक यांनी केला आहे. रियाज भाटीने पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत फोटो काढले आहेत. इतक्या सुरक्षा यंत्रणेत रियाज भाटीसारखी व्यक्ती पंतप्रधानांसोबत फोटो कशी काढू शकते असाही आरोप केला आहे.

दाऊदचा माणुस पीएम मोदींच्या कार्यक्रमात कसा पोहचला ?

दाऊद इब्राहिमच्या गॅंगशी संबंध असलेला व्यक्ती रियाज भाटी कोण आहे ? जी व्यक्ती दोन पासपोर्टसह सापडते आणि दोन दिवसात सुटते असा सवाल नवाब मलिक यांनी आजच्या पत्रकार परिषदेत केला. भाजपच्या कार्यक्रमात ही व्यक्ती सगळीकडे कशी काय दिसते ? पीएम मोदी मुंबई आल्यावर त्या कार्यक्रमातही ही व्यक्ती पोहचते. कोणत्याही स्कॅनिंगशिवाय ही व्यक्ती कार्यक्रमात कशी काय पोहचते ? फडणवीस मुख्यमंत्री असताना रियाज भाटीची पोहच ही भाजपच्या कार्यक्रमात होती असाही आरोप मलिक यांनी केला. दोन पासपोर्टसारखा गंभीर आरोप असलेला व्यक्ती तुमच्यासोबत कसा काय दिसतो ? रियाज भाटी हा फडणवीसांच्या संरक्षणामध्येच खंडणी वसुलीचा धंदा चालवत होता असा आरोपही मलिकांनी केला.

- Advertisement -

कोण आहे रियाज भाटी ?

दाऊदचा अतिशय जवळचा समजला जाणाऱ्या व्यक्तींपैकी एक रियाज भाटी आहे. रियाज भाटीविरूद्ध भारत सरकारने २०१५ मध्ये लुकआऊट नोटीस जारी केले होते. त्यानुसार इमिग्रेशन दरम्यान दोन पासपोर्ट बाळगल्या प्रकरणी रियाज भाटीला अटक करण्यात आली. तपास यंत्रणांना हवा असलेला रियाज भाटीला सहार एअरपोर्टवर चेकींग दरम्यान पकडण्यात आले. छोटा राजनच्या अटकेच्या आनंदात दाऊदने जोहन्सबर्ग येथे ठेवलेल्या पार्टीला रियाज भाटी जाणार होता. त्यावेळीच इमिग्रेशन दरम्यान रियाजला अटक करण्यात आली. पण अवघ्या दोन दिवसात रियाजला कुणाच्या आशीर्वादाने सोडून देण्यात आले ? असा सवाल नवाब मलिक यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे. हे प्रकरण दाबण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी मदत केल्याचा आरोपही नवाब मलिक यांनी केला.

रियाजकडे सापडलेल्या पासपोर्टमध्ये त्याने अनेकदा बनावट पासपोर्टद्वारे प्रवास केल्याचे आढळले होते. या प्रवासासाठी दोन पासपोर्ट रियाज वापरत होता. एक पासपोर्ट हा G3128659 क्रमांकाचा होता. हा पासपोर्ट रियाजने जयपूरमधून २००७ साली तयार केला होता. फूलजी भाटी नावाने हा पाटपोर्ट काढला होता. तर दुसरा पासपोर्ट हा २०१३ मध्ये Z 2479378 क्रमांकाने काढला होता. पहिल्या पासपोर्टवर जन्मतारीख १२ जून १९६८ आहे. तर दुसऱ्या पासपोर्टवर १९६२ होती.

- Advertisement -

रियाजवर अनेक गुन्हे दाखल

मुंबईतील प्रसिद्ध बिल्डरपैकी एक असा रियाज आहे. त्याच्यावर अनेक खटले आहेत. २००८ मध्ये खंडाळा गोळीबार, २००९ मध्ये भूखंड बळकावण्याच्या प्रकरणात रियाजचे नाव आले होते. हवाला व्यवहारातही रियाज सक्रीय असल्याची मुंबई पोलिसांची माहिती आहे. अंडरवर्ल्ड गॅंगस्टर इक्बाल अटरवाला आणि अजय गांडा याच्यासोबत तो दाऊदच्या पार्टीतही सहभागी झाला होता अशी माहिती आहे. रियाजची स्वतःची जिमनॅस्टिक फेडरेशन ऑफ इंडिया ही अकॅडमी आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मार्केटिंग कमिटीचा सदस्य म्हणूनही रियाझ भाटीचा ट्विटर प्रोफाईलवर उल्लेख आहे.

राजकारणी, सेलिब्रिटींसोबत रियाज भाटीचे फोटो

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांसोबत रियाज भाटीचा चे फोटो आहेत. तसेच क्रीडा विश्वातील सेलिब्रिटी असलेल्या पी व्ही सिंधू, सुनिल गावस्कर तसेच संजय दत्तपासून अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींसोबत रियाज भाटीचे फोटो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतचाही रियाज भाटीचा फोटो आहे.

aslam sheikh
मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख आणि रियाज भाटी
P V sindhu and riyaz bhati
पी व्ही सिंधू आणि रियाज भाटी
Ravindra chavan
भाजप नेते रवींद्र चव्हाण आणि रियाज भाटी

 


देवेंद्र फडणवीसांचे बनावट नोटांचे रॅकेट; नवाब मलिकांचा हायड्रोजन बॉम्ब

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -