घरताज्या घडामोडीपाक सरकारच्या बोंबा,म्हणे ५०० राफेल आले तरी फरक पडत नाही!

पाक सरकारच्या बोंबा,म्हणे ५०० राफेल आले तरी फरक पडत नाही!

Subscribe

'भारत राफेल आणो किंवा s-400, आम्ही तयार आहोत. ५ येवोत किंवा ५०० आम्हाला काहीही फरक पडत नाहीत. आम्ही तयार आहोत', अशा पाक सरकारच्या उलट्या बोंबा सुरु झाल्या आहेत.

भारताच्या फक्त ५ राफेल लढाऊ विमानांनी पाकिस्तानला घाबरवून सोडले आहे. भारताच्या राफेलमुळे पाकिस्तानची चांगलीच घाबरगुंडी उडाली असून त्यांची पहिली कबुली समोर आली आहे. पाकिस्तानच्या सेनेचे प्रवक्ते मेजर जनरल बाबर इफ्तिखार यांनी याबद्दल वक्तव्य केले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, ‘भारत राफेल आणो किंवा s-400, आम्ही तयार आहोत. ५ येवोत किंवा ५०० आम्हाला काहीही फरक पडत नाहीत. आम्ही तयार आहोत’, अशा पाक सरकारच्या उलट्या बोंबा सुरु झाल्या आहेत.

पाकिस्तानच्या सेनेचे प्रवक्ते म्हणतात…

पाकिस्तानच्या सेनेचे प्रवक्ते मेजर जनरल बाबर इफ्तिखार म्हणाले की, ‘५ राफेल येवोत किंवा ५०० आम्हाला काहीही फरक पडत नाहीत. आम्ही तयार आहोत. त्यांनी सांगितले आहे की, पाकिस्तानची संरक्षण क्षेत्रातली तरतूद खूप जास्त, म्हणजे १७ टक्के आहे. मात्र, गेल्या दहा वर्षांत ती तरतूद घटली आहे. या संसाधनांच्या जोरावरही आम्ही आमच्या शत्रूंशी लढण्यासाठी पूर्णपणे तयार आहोत. त्यामुळे भारत राफेल आणो किंवा s-400, आम्ही तयार आहोत’.

- Advertisement -

राफेल लढाऊ विमानांची भीती जाहीर

पाकिस्तानने भारताच्या राफेल लढाऊ विमानांची भीती जाहीर केली आहे. राफेल भारतात आल्यानंतर १५ दिवसांनी पाकिस्तानने हे मान्य केले आहे की, राफेलशी टक्कर घेण्याची त्यांची तयारी नाही. ही गोष्ट फक्त राफेलशीच संबंधित नाही. S-400 एअर डिफेन्स सिस्टिम अद्याप रशियाकडून भारतात आलेलीही नाही. पण, S-400ने आत्तापासूनच पाकिस्तानची झोप उडवली आहे.


हेही वाचा – Corona काळातही बड्या धेंडांच्या पार्ट्या, १५ मिनिटांत कोरोना टेस्ट!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -