घरदेश-विदेशपाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्याची धमकी; भारताला प्रत्युत्तर देणार

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्याची धमकी; भारताला प्रत्युत्तर देणार

Subscribe

पाकिस्तानला भारताला जशास तसे उत्तर देण्याचा, तसेच आत्मसंरक्षणाचा हक्क आहे.' असे पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महसूद कुरेशी यांनी सांगितले.

पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा बदला अखेर भारताने घेतला आहे. पाकिस्तानच्या बालकोटमध्ये असलेल्या जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे तळ भारताने उध्वस्त केले. भारताच्या हवाई दलाने एअर स्ट्राईक करत पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले. दरम्यान, पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महसूद कुरेशी यांनी देखील भारताला धमकी दिली आहे. भारताला या एअर स्ट्राईकचे उत्तर देऊ असे कुरेशी यांनी सांगितले आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ‘ही भारताकडून पाकिस्तानच्याविरोधात आक्रमकता आहे. हे एलओसीचे उल्लंघन आहे आणि पाकिस्तानला भारताला जशास तसे उत्तर देण्याचा, तसेच आत्मसंरक्षणाचा हक्क आहे.’ असे कुरेशी यांनी सांगितले आहे. दरम्यान, ‘मी पंतप्रधान इमरान खान यांची भेट घेणार आणि परराष्ट्र मंत्रालयाचे मत त्यांच्यासमोर मांडणार आहे.’ असे देखील कुरेशी यांनी सांगितले.

- Advertisement -

पंतप्रधानांची भेट घेणार

भारतीय वायू सेनेने पीओकेवरील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळावर हल्ला केल्यानंतर परराष्ट्रमंत्री कुरेशी यांनी ताततडीची बैठक बोलावली. त्यानंतर त्यांनी पाकिस्तानमधील वृत्तवाहिनी दुनिया न्यूजला प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी सांगितेल की, ‘पाकिस्तानने याप्रकरणावर जगातील इतर देश आणि त्यांच्या परराष्ट्र मंत्रालयाशी बातचित केली. पाकिस्तानची सेना भारताच्या कारवाईला उत्तर देण्यास तयार आहे. पंतप्रधान इमरान खान यांच्यासोबत बैठक होणार’, असल्याची प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा – 

- Advertisement -

कच्छ सीमेवर पाकिस्तान ड्रोन, लष्कराने तात्काळ केली कारवाई

हल्ल्यानंतर सोशल मीडियावर पाकिस्तानची खिल्ली! धम्माल जोक्स व्हायरल!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -