घरदेश-विदेशकच्छ सीमेवर पाकिस्तान ड्रोन, लष्कराने तात्काळ केली कारवाई

कच्छ सीमेवर पाकिस्तान ड्रोन, लष्कराने तात्काळ केली कारवाई

Subscribe

भारताने केलेल्या वायू हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र लष्कराने ड्रोन नष्ट केले आहे.

पाकिस्तानवर वायू हल्ला केल्यानंतर पाकिस्तानमध्ये हाय अलर्ट घोषीत करण्यात आला आहे. या हल्ल्यानंतर पाकिस्तानने हालचाली सुरु केल्या आहे. हल्ल्याच्या काही वेळेनंतर पाकिस्तानचे ड्रोन गुजरातच्या कच्छच्या सीमेवर आढळून आले होते. याहल्ल्यानंतर पाकिस्तानी ड्रोन भारताच्या सीमेत घूसण्याचा प्रयत्न करत असल्याचे आढळून आले होते. लष्कराने तत्काळ कारवाई करून या ड्रोनला नष्ट केले आहे. सकाळी साडे सहाच्या सुमारास हे ड्रोन पाडण्यात आले. लष्कराने याबाबत अधिकृत वक्तव्य केले नाही.

पाकिस्तान येथील दहशतवादी कॅम्पवर पहाटे साडे तीन वाजता भारताच्या विमानांनी कारवाई केली होती. पाकिस्तानवर भारतीय वायुसेनेने बॉम्ब हल्ला केला होता. यामध्ये ३०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -