घरताज्या घडामोडीCorona: पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मोहम्मद कुरेशी यांना कोरोनाची लागण!

Corona: पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मोहम्मद कुरेशी यांना कोरोनाची लागण!

Subscribe

पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांना याबाबत स्वतः ट्विट करून माहिती दिली आहे.

संपूर्ण जगात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढताना दिसत आहे. जगात १ कोटी १० लाखांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर त्यापैकी ५ लाख २६ हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. या कोरोनामुळे अनेक देशांची परिस्थिती बिकट होत आहे. त्यापैकी एक देश पाकिस्तान आहे. पाकिस्तानात २ लाखांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. दरम्यान पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मोहम्मद कुरेश यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यांनी याबाबत स्वतः ट्विट करून माहिती दिली आहे.

पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मोहम्मद कुरेश यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘त्या दुपारी मला सौम्य ताप आल्यासारखे वाटले. त्यामुळे मी ताबडतोब स्वतःला घरीच क्वारंटाईन करून घेतले. आता माझा कोविड-१९ चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. पण माझ्या शरीरात मजबुती आणि तंदुरुस्ती अल्लाच्या कृपेने आहे. मी माझे कर्तव्य घरातूनच पार पाडणार आहे. कृपया माझ्यासाठी प्रार्थना करा.’

- Advertisement -

वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, पाकिस्तानात आतापर्यंत २ लाख २१ हजार ८९६ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर यापैकी ४ हजार ५५१ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच १ लाख १३ हजार ६२३ रुग्ण रिकव्हर झाले आहेत. सध्या पाकिस्तानात १ लाख ३ हजार ७२२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – पाकिस्तानात रेल्वेची बसला धडक; भीषण अपघातात १९ शीख यात्रेकरुंचा मृत्यू


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -