घरदेश-विदेशभारतीय शिख भाविकांना पाकिस्तानकडून व्हिसा

भारतीय शिख भाविकांना पाकिस्तानकडून व्हिसा

Subscribe

शिख धर्माचा महत्वाचा सण म्हणजेत बैसाखी सण साजरा करण्यासाठी पाकिस्तानने भारतीय २२०० भाविकांना व्हिसा देण्याचे जाहिर केला आहे.

एप्रिल महिना आला की, सर्व भारतातील शिख बांधवाना बैसाखी सणाचे वेद लागतात. प्रमुख्याने भारतातील पंजाबमध्ये हा सण साजरा केला जातो. मात्र, आता बैसाखी सणात पाकिस्तान सहभागी होणार आहेत. पाकिस्तानाने बैसाखी सणात सहभागी होण्यासाठी २२०० भारतीय शिख भाविकांना व्हिसा देण्याचे जाहिर केले आहे. पाकिस्तानमध्ये बैसाखी सण १२ ते २१ एप्रिल दरम्यान साजरा केला जाणार आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या उच्चायुक्तालयाने शिख भाविकांना बैसाखी सणात सहभागी होण्यासाठी व्हिसा दिला आहे. भारत-पात या दोन देश्यामध्ये असलेले तणाव या कारणामुळे कमी होण्याते संकेत मिळत आहे.

पाकिस्तानत शिखांचे तीर्थक्षेत्र

पाकिस्तानामध्ये शिखांचे तीर्थक्षेत्रे आहेत. पंजा साहिब गुरूद्वार, ननकाना साहिब हे पाकिस्तानमधील शीखांचे महत्वाचे तीर्थक्षेत्र आहेत. तसेच शिखांचे पहिले गुरू गुरूनानक देव यांचे करतारपूर साहिब हे निवासस्थान आहे. त्यामुळे या ठिकाणी हजारो भाविक भारतातून दरवर्षी येत असतात. यासंबंधी पाकिस्तानचे उच्चायुक्त सोहेल मेहमूद यांनी सांगितले की, ‘आम्ही पाकिस्तानामध्ये येणाऱ्या भाविकांना शुभेच्छा देत आहोत’. तसेच अलिकडेच पाकिस्तानाने या महिन्यात ३६० भारतीय कैद्यांना सोडण्याची घोषणा केली आहे. त्या कैद्यांमध्ये मच्छीमाऱ्यांची संख्या अधिक आहे.

- Advertisement -

बैसाखी सणा बद्दल

बैसाखी सण पंजाबमध्ये साजरा केला जातो. तसेच प्रामुख्याने हा सण शेती कापणी करण्यावेळी साजरा केला जातो. हिंदू संप्रदयातील बैसाखी सण हा एतिहासिक आणि धार्मिक सण आहे. या दिवशी शीख संप्रदाय नवीन वर्षही सुरू होते. शीख धर्मात वसंत ऋतूतील कापणीच्या हंगामाच्या दिवसात म्हणूनही या दिवसाचे महत्व आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -