घरदेश-विदेशही व्यक्ती भेटली आणि पाकिस्तानचे पंतप्रधान थेट आयसोलेशनमध्ये!

ही व्यक्ती भेटली आणि पाकिस्तानचे पंतप्रधान थेट आयसोलेशनमध्ये!

Subscribe

पंतप्रधान इम्रान खान यांनी सध्या सेल्फ आयसोलेशनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची कोरोनाची चाचणी करण्यात आली आहे. पंतप्रधान एका व्यक्तीच्या संपर्कात आले होते, ही व्यक्ती मंगळवारी कोरोना पॉझिटिव्ह आल्याची बाब समोर आली आहे. यानंतर इम्रान खान यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती, मात्र अद्याप इम्रान यांच्या चाचणीचे रिपोर्ट आलेले नाही आहेत. परंतु चाचणी केल्यानंतर इम्रान यांनी स्वत:ला आयसोलेशनमध्ये ठेवले आहे.

पंतप्रधान इम्रान खान यांनी काही दिवसांपूर्वी देशातील एका बड्या व्यक्तीची भेट घेतली होती. ती व्यक्ती इधी फाउंडेशनचे अध्यक्ष फैसल इधी असून ते एक मोठे समाजसेवक आहेत. फैसल यांनी कोरोनाविरूद्धच्या लढ्यात पाकिस्तान सरकारला एक कोटी आर्थिक मदतीचा धनादेश देण्यासाठी भेटले होते. या भेटीनंतर फैसल यांची चाचणी घेण्यात आली तेव्हा ते कोरोना पॉझिटिव्ह आढळले. हे समजल्यानंतर इस्लामाबाद येथील रुग्णालयाच्या डॉक्टरांनी इम्रान खानच्या कोरोना विषाणू चाचणी केली आहे.

- Advertisement -

इम्रान खान आणि इधी यांचा फोटो PTI या ट्विटरवरून शेअर करण्यात आला होता. यांनी कोरोना व्हायरसचा प्रसार होत असताना देखील कोणतीही खबरदारी घेतली नसल्याचे दिसत आहे. यामुळेच डॉक्टरांनी कोणताही धोका न घेता इम्रान खानची चाचणी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, या दोघांमधील बैठक साधारण ६ ते ७ मिनिटे चालली होती. फैसल यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने पंतप्रधान इम्रान खान सध्या सेल्फ आयसोलेशनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी ते कोणत्याही व्यक्तीची भेट घेणार नसल्याचे सांगितले आहे.

- Advertisement -

कोरोना इफेक्ट: स्विगीच्या मागणीत ६० टक्क्यांनी घट, १००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढणार

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -