घरदेश-विदेशपंजाब सीमारेषेवर पाकिस्तानी गुप्तहेराला अटक

पंजाब सीमारेषेवर पाकिस्तानी गुप्तहेराला अटक

Subscribe

पंजाब सीमारेषेवर पाकिस्तानच्या एका गुप्तहेराला पकडण्यात सीमा सुरक्षा दलाला यश आले आहे. या हेराकडे उत्तर प्रदेशच्या मुरादाबाद येथील वास्तव्याचे खोटे कागदपत्रे आहेत.

सीमा सुरक्षा दलाने पंजाबच्या फिरोजपुर सीमारेषेवर पाकिस्तानच्या एका गुप्तहेराला पकडले आहे. या गुप्तहेराकडे भारतीय रहिवाशाचे खोटे कागदपत्रे सापडली आहेत. त्याच्याकडे मिळालेल्या कागदपत्रांनुसार तो उत्तर प्रदेशच्या मुरादाबादचा नागरिक आहे. त्याच्या मोबाईलमध्ये पाकिस्तानचे सीमकार्ड सापडले आहे. यासोबतच आठ पाकिस्तानी मोबाईल नंबर आणि सहा पाकिस्तानी गृपशी त्याचे संबंध असल्याते समोर आले आहे. तो पोलिसांचे फोटो काढत होता. या व्यक्तीला सीमा सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलं आहे.

- Advertisement -

भारत-पाकिस्तान तणावात वाढ

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान तणावात वाढ झाली आहे. हा तणाव गेल्या दोन दिवसांच्या घडामोडींमुळे आणखी वाढली आहे. या दोन दिवसांमध्ये पाकिस्तानच्या सैन्याकडून ३५ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघण झाले आहे. दरम्यान, बुधवारी सकाळी पाकिस्तानचे तीन लढाऊ विमान भारतीय हवाई हद्दीत शिरले. या लढाऊ विमानांनी भारतात बाँब हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारतीय हवाई दलाने त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडला. भारतीय हवाई दलाने पाकिस्तानचे एक लढाऊ विमान खाली पाडले. तर, बाकीचे दोन विमान पळून गेले. या दरम्यान, भारताचे एक लढाऊ विमान पाकिस्तानच्या हवाई हद्दीत शिरले आणि क्रॅश झाले. या विमानाचा पायलट पॅरेशूटमार्फत खाली उतरला. परंतु, तो पाकिस्तानच्या एलओसीमध्ये उतरला. यामुळे पाकिस्तानने त्याला ताब्यात घेतलं. परंतु, भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानवर दबाव टाकत पाकिस्तानला नमतं केलं. त्यामुळे आज पाकिस्तान या पायलटला भारताच्या स्वाधीन करणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -