घरटेक-वेकआता लवकरच विमान आणि बोटींवर मिळणार इंटरनेट सेवा

आता लवकरच विमान आणि बोटींवर मिळणार इंटरनेट सेवा

Subscribe

भारतातील विमान आणि बोटीवर वायफायच्या सहाय्याने इंटरनेट पोहचवले जाणार आहे. येत्या काळात दुर्गम भागातही इंटरनेट सेवा लोकांना उपलब्ध करून देण्यासाठी लवकरच परवाने काढण्यात येणार आहेत.

प्रवाशांना दुर्गम भागात इंटरनेटची सुविधा मिळवून देण्यासाठी ह्यूजेस कम्युनिकेशन्स इंडिया (HCIL) नवीन प्रकल्प राबवत आहे. भारताच्या दूरसंचार नियामक प्राधिकरण या प्रकल्पावर काम लवकरच सुरु करणार आहे. भारतातील देशांतर्गत विमानसेवा आणि बोटीवर इंटरनेट सुविधा देण्यासाठी ही सेवा सुरु केली जाणार आहे. या प्रकल्पासाठी नुकतेच लायसन्स कंपनीला देण्यात येणार आहे. या सेवेमुळे देशांतर्गत जलमार्ग आणि विमान मार्गावर इंटरनेटची सेवा वापरता येईल. अनेकदा इंटरनेटनसल्यामुळे देशातील काही भागात इंटरनेट सुविधा वापरु शकत नाही. यामुळे अनेकदा प्रवाशांची गैरसोय होते. प्रवाशी व्यतिरिक्त इतर देशातील जहाजांवरील नागरिकांना भारतात इंटरनेटची सेवा उपलब्ध होत नव्हती. 

“ही सेवा पुरवण्यासाठी एका विशेष परवन्याची गरज आहे. या परवान्याला एफएमसी असे म्हणतात. परवाना प्राप्त करणारी एचसीआयएल ही देशातील पहिली कंपनी आहे. एचसीआयएल ही कंपनी अधिकृतरित्या इंटरनेट प्रोव्हायडर आहे. दहा वर्षांसाठी हा परवाना मिळला आहे. या सेवामुळे प्रवाशांना हाय कॉलिटी आणि स्पीड इंटरनेट मिळणार आहे. सेवेमुळे प्रवासात येणाऱ्या अडचणींवरही मात करण्यास मदत मिळणार आहे.” – कंपनीचे प्रवक्ते

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -