घरदेश-विदेशHalal Row : 'हलाल' मुद्द्यावरून 'हिमालया' ट्रोल; अन् पतंजलीही अडकली वादात?

Halal Row : ‘हलाल’ मुद्द्यावरून ‘हिमालया’ ट्रोल; अन् पतंजलीही अडकली वादात?

Subscribe

हलाल वादावरून सध्या सोशल मीडियावर ‘बॉयकट हिमालया’ ट्रेंड सुरु आहे. सोशल मीडियावर याचा एका फोटोही तुफान व्हायरल होतोय. ज्यात हिमालय फार्मास्युटिकल कंपनी हलाल पॉलिसीचे पालन करते असा उल्लेख आहे. मात्र अनेकांनी यातील हलाल शब्दाचा अर्थ मांस असा काढत आहेत. त्यामुळे बॉयकॉट हिमालय ट्विटरवर ट्रेंड होऊ लागला आहे. सोशल मीडियावर आता हिमालयाविरोधात सुरु असलेल्या ट्रेंडमध्ये अभिनेता परेश रावलही सामील झाले आहेत. अभिनेता आणि भाजप नेते परेश रावल यांनी 1 एप्रिल रोजी हिमालयावर बहिष्कार टाका असं एक ट्विट केले होते.

paresh rawal tweet
paresh rawal tweet

मात्र हे ट्विट त्यांनी काही वेळाने डिलीट केले. त्यांच्या ट्विटनंतर काही तासांतच कंपनीने आपली प्रतिक्रिया दिली आहे. हिमालयाने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून ट्विट करत लिहिले की, “धन्यवाद परेश रावल. हिमालयासारख्या 90 वर्ष जुन्या स्वदेशी ब्रँडचा तुम्ही तिरस्कार का करता हे आम्हाला माहीत नाही, पण परेश जी आम्ही तुमच्यावर प्रेम करतो. शर्मा जी नमकीन या तुमच्या नवीन चित्रपटासाठी अभिनंदन!” मात्र ‘हलाल’ मुद्द्यावरून ‘हिमालया’ ट्रोल होत असली तरी  पतंजली देखील या वादात अडकली आहे.

- Advertisement -

‘हिमालया’कंपनीने पुढे दिले ‘हे’ स्पष्टीकरण

या बायकॉट कॅम्पेनची सुरुवात एका व्हायरल फोटोनंतर सुरु झाली आहे. ज्यात कंपनीने हलाल पॉलिसीचे पालन करण्याविषयी लिहिण्यात आले आहे. फोटोनुसार, कंपनीने म्हटले आहे की, इस्लामिक नियम, शरियाचे पालन करून सर्व हर्बल आणि केमिकल उत्पादने तयार करते. कंपनीचे म्हणणे आहे की, त्यांच्या उत्पादनांमध्ये असा कोणताही पदार्थ वापरला जात नाही. जो इस्लाममध्ये प्रतिबंधित मानला जातो.

- Advertisement -

‘हलाल’चा उल्लेख आल्यावर लोकांना वाटले की, हिमालया आपल्या उत्पादनांमध्ये मांसचा वापर करतात. त्यामुळे ट्विटरवर हिमालयाच्या विरोधात ट्रेंड सुरू झाला. या संपूर्ण वादावर कंपनीने एक निवेदन जारी करून या सर्व अफवांचे खंडन केले आहे. ट्विटमध्ये कंपनीच्या वतीने लिहिले आहे, “आम्ही हे स्पष्ट करू इच्छितो की, हिमालयाच्या कोणत्याही उत्पादनांमध्ये मांस नाही, जसे काही सोशल मीडिया पोस्टमध्ये दावा केला जात आहे. हा दावा वस्तुस्थितीनुसार चुकीचा आहे. हलाल प्रमाणपत्राचा अर्थ असा नाही की कोणत्याही उत्पादनामध्ये प्राण्यांपासून तयार केलेले घटक वापरले जातात. आयात करणाऱ्या देशांचा हा नियम शाकाहारी उत्पादनांनाही लागू होतो. या देशांमध्ये निर्यात करणाऱ्या सर्व कंपन्यांना हे धोरण अवलंबावे लागेल.

हलाल सर्टिफिकेटचा फोटो व्हायरल होताच पंतजलीचे स्पष्टीकरण

आता काही युजर्सनी पतंजलीसह अनेक भारतीय ब्रँडच्या हलाल प्रमाणपत्राचा फोटो शेअर करत हिमालयाविरुद्ध चालवल्या जाणाऱ्या ट्रेंडवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, हलाल वादात पतंजलीचे नाव आल्यानंतर कंपनीने हलाल प्रमाणपत्रावर आपली भूमिका मांडली आहे. कंपनीचे सरचिटणीस आचार्य बाळकृष्ण म्हणाले की, भारतातील बहुराष्ट्रीय कंपन्या स्वामी रामदेव यांच्या पतंजली प्रतिष्ठानने हलाल मांस निर्यातीसाठी हलाल प्रमाणपत्र घेतल्याचा प्रचार करत आहेत, परंतु प्रत्यक्षात हा खोटा प्रचार आहे. पतंजलीच्या उत्पादनाची भारतात विक्री थांबवावी अशी कंपन्यांची इच्छा आहे. खरे तर हे प्रमाणपत्र आयुर्वेदिक औषधे अरब देशांमध्ये निर्यात करण्यासाठी घेण्यात आली आहे.


cm uddhav thackeray : महाराष्ट्र देशाच्या अर्थव्यवस्थेचा मोठा आधार; मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -