घरदेश-विदेशपॅरिसमध्ये वृद्धाने केला अंधाधुंद गोळीबार, दोन ठार तर चारजण जखमी

पॅरिसमध्ये वृद्धाने केला अंधाधुंद गोळीबार, दोन ठार तर चारजण जखमी

Subscribe

पॅरिसमध्ये मेट्रो स्थानकाजवळ ही घटना घडली. येथे खूप रेस्टाॅरंट व दुकाने आहेत. सांस्कृतिक केंद्रही येथे आहे. त्यामुळे हा परिसर गर्दीने भरलेला असतो. गोळीबार झाल्यानंतर पोलीस तत्त्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी नागरिकांना घटस्थळापासून दूर राहण्याचा सल्ला दिला. गोळीबार करणाऱ्या वृद्धाला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडील बंदुकही पोलिसांनी जप्त केली आहे. गोळीबाराचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

फ्रान्सः पॅरिसमध्ये ६९ वर्षीय वृद्धाने अंधाधुंद गोळीबार केल्याची घटना घडली आहे. या घटनेत दोघाजणांचा मृत्यू झाला असून चारजण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नगारिकांमध्ये भीती पसरली आहे.

पॅरिसमध्ये मेट्रो स्थानकाजवळ ही घटना घडली. येथे खूप रेस्टाॅरंट व दुकाने आहेत. सांस्कृतिक केंद्रही येथे आहे. त्यामुळे हा परिसर गर्दीने भरलेला असतो. गोळीबार झाल्यानंतर पोलीस तत्त्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी नागरिकांना घटस्थळापासून दूर राहण्याचा सल्ला दिला. गोळीबार करणाऱ्या वृद्धाला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडील बंदुकही पोलिसांनी जप्त केली आहे. गोळीबाराचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

- Advertisement -

मात्र येथील दुकानदारांमध्ये भितीचे वातावरण होते. गोळीबारामुळे आम्ही सर्व घाबरुन गेलो आहोत. आम्ही आमची दुकाने बंद ठेवली आहेत. तर ७ ते ८ वेळा गोळीबार झाला. त्यामुळे आम्ही खूपच घाबरलो होतो, असे एका महिलेने सांगितले. तसेच गोळीबार झाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ आपतकालीन व्यवस्था सुरु केली. त्यामुळेच आम्हाला घटस्थळाहून बाहेर पडता आले, असे एका नागरिकाने सांगितले.

फुटबाॅल विश्वचषक स्पर्धेत अर्जंटीनाकडून फ्रान्सचा पराभव झाला. त्यामुळेही फ्रान्स धुमसत आहे. हा सामना अटीतटीचा होणार हे निश्चित होते. त्याप्रमाणे हा सामना अटीतटीचाच झाला. अर्जंटीनाने पहिल्या ४५ मिनिटांत दोन गोल मारले. त्यामुळे त्यांचे पारडे जड होते. मात्र शेवटच्या दहा मिनिटांत सर्व चित्र बदलले. फ्रान्सने दोन गोल मारत सामन्यात बरोबरी केली. त्यामुळे सामना अतिरिक्त दहा मिनिटे खेळवण्यात आला. त्यातही अर्जंटीनाने पहिल्या पाच मिनिटांत गोल मारला. परिणामी विश्वचषकावर अर्जंटीनाचेच नाव कोरले जाईल, अशी शक्यता निर्माण झाली होती. मात्र सामना संपण्यासाठी अवघी काही मिनिटे शिल्लक असताना अर्जंटीनाच्या खेळाडूच्या हाताला बाॅल लागला आणि फ्रान्सला संधी मिळाली. त्याचा फायदा घेत फ्रान्सने गोल मारला व फ्रान्सच्या चाहत्यांनी एकच जल्लोष केला. सामना बरोबरीचा झाल्याने पाच पेनाल्टी किकची संधी दोन्ही संघांना देण्यात आली. यामध्ये मात्र अर्जंटीनाने बाजी मारली व विश्वचषकावर आपली मोहर उमटवली.

- Advertisement -

या पराभवामुळे फ्रान्सचे समर्थक रस्त्यावर उतरले. समर्थकांनी वाहनांची जाळपोळ केली. तोडफोड केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रु धुराच्या नळकांड्या फोडल्या. त्यानंतरही फुटबाॅल विश्वचषक स्पर्धेतील पराभवामुळे फ्रान्समध्ये हिंसाचार सुरुच होता. त्यातच शुक्रवारी एका वृद्धाने गर्दीच्या ठिकाणी गोळीबार केला आणि एकच खळबळ उडाली.

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -