घरदेश-विदेशPaytm's Wallet: मुकेश अंबानी खरेदी करणार Paytm? बातमीमुळे JioFin च्या स्टॉकमध्ये उसळी,...

Paytm’s Wallet: मुकेश अंबानी खरेदी करणार Paytm? बातमीमुळे JioFin च्या स्टॉकमध्ये उसळी, वाचा सविस्तर

Subscribe

मुंबई: पेटीएमवरील संकट कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. ऑनलाइन पेमेंट सेवा पुरवणारी ही कंपनी दररोज मोठ्या तोट्याचा सामना करत आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) बँकिंग सेवांवर बंदी घालण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर पेटीएमचे शेअर सातत्याने घसरत आहेत. (Paytm s Wallet Mukesh Ambani to buy Paytm JioFin stock jumps on news read more)

दरम्यान, सोमवारी एक बातमी समोर आली की, पेटीएमचा वॉलेट व्यवसाय विकला जाणार आहे आणि मुकेश अंबानींची नवीन कंपनी JioFinancial Services ते खरेदी करण्यात रस दाखवत आहे. या बातमीचा परिणाम JioFin च्या शेअर्सवरही दिसून आला आणि त्यांच्या शेअर्सने 14 टक्क्यांनी उसळी घेतली. पण या बातम्यांमध्ये किती सत्यता आहे? यावर जिओ फायनान्स आणि पेटीएम या दोन्ही कंपन्यांकडून स्पष्टीकरण जारी करून चित्र स्पष्ट करण्यात आले आहे.

- Advertisement -

पेटीएम स्टॉक क्रॅश, जिओफिन स्टॉक वाढला

आरबीआयच्या कारवाईनंतर पेटीएमचे संकट वाढले आहे आणि पेटीएमची मूळ कंपनी One97 कम्युनिकेशन लिमिटेडचे शेअर्स दररोज घसरत आहेत. दुसरीकडे, आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या नवीन कंपनी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचे शेअर्स मात्र उसळी घेत आहेत.

जिओ फायनान्शिअलच्या शेअर्समध्ये ही वाढ प्रत्यक्षात काही अहवालांनंतर दिसली, ज्यामध्ये मुकेश अंबानींच्या NBFC कंपनीने पेटीएमचा वॉलेट व्यवसाय खरेदी करण्याची तयारी दर्शवली होती. या अहवालांमध्ये असे म्हटले आहे की, पेटीएमचा वॉलेट व्यवसाय घेण्यासाठी NBFC JioFIn One97 कम्युनिकेशनशी बोलणी करत आहे. मात्र, सायंकाळी उशिरा अंबानींच्या कंपनी जेएफएसएलने स्टॉक एक्स्चेंज फाइलिंगमध्ये या बातम्यांबाबत स्पष्टीकरण देताना हे सर्व निव्वळ अफवा असून, आम्ही यासंदर्भात काहीही चर्चा करत नसल्याचे स्पष्ट केले. कंपनीच्यावतीने सांगण्यात आले की, आम्ही नेहमीच आमच्या जबाबदाऱ्यांचे पालन करत खुलासे करत आलो आहोत आणि पुढेही करत राहू.

- Advertisement -

पेटीएमनेही स्पष्ट केले चित्र!

मुकेश अंबानींच्या जिओ फायनान्शियल सर्व्हिसेससह, पेटीएमनेही अहवालांवर स्पष्टीकरण दिले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, एका अहवालात असे म्हटले आहे की, कंपनी विक्रीसाठी कोणत्याही कंपनीशी चर्चा करत नाही. हे लक्षात घेण्यासारखे आहे की ट्रेडिंगच्या अवघ्या तीन दिवसांत पेटीएमचे शेअर्स 43 टक्क्यांनी घसरले आहेत आणि कंपनीचे मार्केट कॅप 20,500 कोटी रुपयांहून अधिक घसरले आहे.

पेटीएमचे सीईओ म्हणाले – नोकरकपात होणार नाही

पेटीएमच्या संकटाच्यावेळी एका टाऊनहॉलमध्ये, संस्थापक आणि सीईओ विजय शेखर शर्मा यांनी या संकटाच्या काळातही आपल्या कर्मचाऱ्यांना मोठे आश्वासन दिले आहे. बिझनेस टुडेवर प्रकाशित झालेल्या मनी कंट्रोलच्या अहवालानुसार, पेटीएमचे सीईओ म्हणाले की, नक्की काय चूक झाली? याबद्दल त्यांना पूर्णपणे खात्री नाही, परंतु लवकरच सर्वकाही सुरळीत होईल. कंपनीत कोणतीही नोकरबंदी केली जाणार नाही आणि आम्ही आरबीआयशी सतत चर्चा करत आहोत, असे ते म्हणाले. यासोबतच पेटीएम इतर बँकांसोबत भागीदारीसाठी काम करत आहे.

RBI च्या कारवाईवर एक नजर

31 जानेवारी 2024 रोजी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने Paytm च्या बँकिंग सेवांमधील अनिश्चिततेबाबत बँकेच्या सेवांवर बंदी घालण्याचा आदेश जारी केला होता. सेंट्रल बँकेने आपल्या आदेशात म्हटले होते की, हा आदेश 29 फेब्रुवारीपासून लागू होणार आहे. यानंतर, या तारखेनंतर पेटीएम पेमेंट बँक नवीन ग्राहक जोडू शकणार नाही. RBI ने बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट-1949 च्या कलम 35A अंतर्गत ही कारवाई केली आहे. रिझर्व्ह बँकेने पेटीएमला 15 मार्चपर्यंत नोडल खाते सेटल करण्याचे आदेश दिले आहेत.

(हेही वाचा: Maharashtra Politics : आरोप करणाऱ्यांचे शेकडो फोटो दाखवता येतील; शिंदे गटाचे प्रत्युत्तर )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -