Mehbooba Mufti House Arrest: महबूबा मुफ्ती पुढील आदेशापर्यंत J&K प्रशासनाच्या नजरकैदत

PDP chief Mehbooba Mufti placed under house arrest in Srinagar
Mehbooba Mufti House Arrest: महबूबा मुफ्ती पुढील आदेशापर्यंत J&K प्रशासनाच्या नजरकैदत

जम्मू-काश्मीर माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या अध्यक्षा महबूबा मुफ्ती यांना प्रशासनाने पुढील आदेशापर्यंत नजरकैदत ठेवले आहे. श्रीनगर येथील आपल्या निवासस्थानी मुफ्ती असल्याचे सांगितले जात आहे. पण जम्मू-काश्मीर प्रशासनाने नजरकैद ठेवण्याबाबत कोणतेही प्रतिक्रिया दिली नाही. अलीकडेच महबूबा मुफ्ती यांनी श्रीनगर येथील हैदरपोरा एन्काउंटवर संदर्भात प्रश्न उपस्थितीत केले होते. या एन्काउंटपासून जम्मू-काश्मीरमध्ये तणावाचे वातावरण पसरले आहे. यानिमित्ताने मारले गेलेले अल्ताफ आणि मुदासीर यांच्या नातेवाईकांनी लाल चौकात कँडल मार्च काढला. यामध्ये मेहबुबा मुफ्ती सहभागी होणार होत्या.

दरम्यान १५ नोव्हेंबरला हैदरपोरामध्ये सुरक्षा दलाने दोन दहशतावाद्यांना ठार केले होते. पोलिसांच्या माहितीनुसार, यादरम्यान दोन सर्वसामान्य नागरिक अल्ताफ भट आणि मुदासीर गुल मारले गेले. पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी दावा केला की, गुल दहशतवाद्यांचा सहकारी होता आणि भटच्या मालकीच्या जागेत कॉल सेंटर चालवत होता. हे अवैध कॉल सेंटर दहशतवाद्यांचे ठिकाण होते. याप्रकरणात महबूबा मुफ्ती यांनी न्यायालयीन चौकशीची मागणी केली होती.

मुफ्ती यांच्या भावांना ईडीचा समन्स

अंमलबजावणी संचालनालय (ईडी)ने बुधवारी मनी लाँड्रिंग प्रकरणात महबूबा मुफ्ती यांचा भाऊ तस्सदुक हुसैन मुफ्ती यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, तस्सदुक यांना गुरुवारी या प्रकरणाच्या तपास अधिकाऱ्यासमोर हजर राहून प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँड्रिंग कायद्याच्या (पीएमएलए) तरतुदींनुसार जबाब नोंदवण्यास सांगण्यात आले आहे. काश्मीरमधील काही व्यवसायांमधून त्यांच्या खात्यात कथितरित्या मिळालेल्या काही पैशांशी संबंधित चौकशी असल्याचे त्यांनी सांगितले. ईडीने आणखी एका मनी लाँड्रिंग प्रकरणात मेहबुबा मुफ्ती यांची चौकशी केली होती.


हेही वाचा – Kulgam Encounter: कुलगाममध्ये दोन ठिकाणी एन्काउंटर: TRFच्या अफाक सिंकदरसह ५ दहशतवाद्यांना केले ठार