Friday, June 11, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश Petrol Diesel Price Today: पेट्रोल-डिझेलच्या दरात आज पुन्हा मोठी वाढ, जाणून घ्या,...

Petrol Diesel Price Today: पेट्रोल-डिझेलच्या दरात आज पुन्हा मोठी वाढ, जाणून घ्या, आजचे दर

Related Story

- Advertisement -

देशात सतत वाढणाऱ्या महागाईबरोबरचं पेट्रोल- डिझेलच्या किंमतही वाढ होत आहे. यात गुरुवारी स्थिरावलेल्या पेट्रोल-डिझेलच्या आज पुन्हा वाढल्या आहेत. पेट्रोल आज २९ पैसे प्रतिलीटर तर डिझेल २८ पैशांनी महागले आहे. मुंबईत पेट्रोसच्या दराने १०१.०४ रुपयांचा टप्पा पार केला आहे. तर डिझेलचे दर ९४.१५ झाले आहेत. दि्ल्लीत आज पेट्रोल ९५.८५ रुपये प्रति लीटर असून डिझेल ८६.७५ रुपये झाले आहे. यात कोलकत्त्यात आज पेट्रोलचा दर ९५. ८० रुपये तर डिझेल ८९.६० रुपये झाले आहे. चेन्नईतही आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल होत क्रमश: ९७.१९ आणि ९१.४२ रुपये प्रति लीटर झाले आहे.

देशातील इतर राज्यांचा विचार केले असता पटनामध्ये आज पेट्रोल ९७.९५ रुपये आणि डिझेल ९२.०५ रुपये प्रति लीटर झाले आहे. तर लखनऊमध्ये प्रति लीटर पेट्रोल ९३.०९ रुपये आणि डिझेल ८७.१५ रुपये झाले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रत्येक क्षणाला तेलाच्या किंमती चढ उतार होत असतात. मात्र भारतात आता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती दर दिवशी सकाळी सहा वाजता बदलतात.

असे पहा पेट्रोल-डिझेलचे ताजे दर

- Advertisement -

इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता. इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर सोप्या पद्धतीने पाहता येतील.


 

- Advertisement -