Thursday, June 24, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर मनोरंजन अविका गौरने धुडकावली फेयरनेस क्रीमची जाहिरात, गोरेपणा म्हणजे सुंदरता नाही

अविका गौरने धुडकावली फेयरनेस क्रीमची जाहिरात, गोरेपणा म्हणजे सुंदरता नाही

अविकाच्या या बेधडकपणाची चर्चा सध्या सोशल मीडियावर जोरदार रंगत आहे अनेकांनी अविकाचे कौतुक देखील केले आहे.

Related Story

- Advertisement -

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री अविका गौर सोशल मीडियावर कमालीची सक्रिय असते. आपल्या आगामी प्रोजेक्ट,फोटोशूट तेच अनेक व्हिडिओ ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. नुकतच अविकला एका फेयरनेस क्रीमच्या जाहिरातीची ऑफर मिळाली होतो. आणि अविकाने ही ऑफर धुडकावून लावल्याची माहिती समोर आली आहे. अविकाने याचे स्पष्टीकरण देत म्हणाली आहे की, समाजात कोणाच्याही रंग-रूपावरुन भेदभाव करणे योग्य नाही. मी या विचारांना बदलू इच्छिते. आणि याच कारणामुळे मी फेयरनेस क्रीमच्या जाहिरातीची ऑफर स्वीकारली नाही. सुंदर बनवणार्‍या क्रीम म्हणजेच चेहर्‍यावर उजाळा आणणे, आणि गोरेपणाचा अर्थ म्हणजे सुंदरता नाही. मला जाहिरातीतून मिळणार्‍या पैशांची फिकीर नाही. अश्या जाहिरातीचा समाजावर चुकीचा प्रभाव पडतो. आणि म्हणून मी जाहिरातमध्ये काम करण्यास नाकर दिला. अविकाच्या या बेधडकपणाची चर्चा सध्या सोशल मीडियावर जोरदार रंगत आहे अनेकांनी अविकाचे कौतुक देखील केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Avika Gor (@avikagor)

- Advertisement -

वर्कफ्रंट बाबतीत सांगायचे झाल्यास अविका नुकतच एका व्हिडिओ सॉन्ग मध्ये झळकली होती यामध्ये तिने आदिल खान सोबत स्क्रीन शेअर केली होती.2008 मध्ये अविका बालिका वधू या मालिकेतून लोकांच्या घरा-घरात पोहोचली होती. यानंतर अविकाने अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केलं. तसेच दाक्षिणात्य सिनेमातसुद्धा अविकाने कामं केलं आहे.


हे हि वाचा – आशुतोषसोबतच्या नात्यावर पहिल्यांदा दिली तेजश्रीने प्रतिक्रिया; म्हणाली, आमच्यात…

- Advertisement -