घरताज्या घडामोडीजनता कर्फ्यू- शाहीन बागमध्ये आंदोलनकर्त्यांवर फेकले पेट्रॉल बॉम्ब

जनता कर्फ्यू- शाहीन बागमध्ये आंदोलनकर्त्यांवर फेकले पेट्रॉल बॉम्ब

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोनाचा फैलाव रोखण्यासाठी देशवासियांना आज जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे. या आवाहनाला देशभरातून प्रतिसाद मिळत असतानाच दिल्लीतील शाहीन बाग येथील आंदोलकांनी मात्र यास नकार दिला. याचदरम्यान, या आंदोलकांवर एका अज्ञाताने पेट्रॉल बॉम्ब फेकल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

जगभरात थैमान घालणाऱ्या करोनाला रोखण्यासाठी जागतिक पातळीवर सर्वच देश विविध योजना राबवत आहे. याचपार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी जनता कर्फ््यूचे जनतेला आवाहन केले. यामुळे ाज देशातील सर्वच रस्त्यांवर शुकशुकाट असून नागरिक घरात बसले आहेत. पण शाहीन बाग येथे सीएए विरोधात आंदोलन करणाऱ्या आंदोलनकर्त्यांनी यास नकार देत सकाळपासून पुन्हा ठिय्या आंदोलन सुरू केले. पोलीस त्यांना हटवत असतानाच एका अज्ञात व्यक्तीने आंदोलकांच्या दिशेने पेट्रॉल बॉम्ब फेकला. यामुळे सगळीकडे एकच गोंधळ उडाला. पोलीस हल्लेखोराचा तपास करत असल्याचे सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

गेल्याच आठवड्यात दिल्ली सरकारने एका ठिकाणी ५० हून अधिक व्यक्तींच्या एकत्र येण्यावर बंदी घातली होती. हा नियम शाहीन बागेतील आंदोलनकर्त्यांसाठीही असल्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी स्पष्ट केले होते. त्यास शाहीन बागेतील महिलांनीही होकार दिला होता. पण आज ५० हून अधिक महिला व पुरूष येथे जमले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -