घरदेश-विदेशपेट्रोल, डिझेल पुन्हा भडकणार?

पेट्रोल, डिझेल पुन्हा भडकणार?

Subscribe

तेल निर्यातदार देशांच्या संघटनेची (ओपेक) ६ डिसेंबरला बैठक होणार आहे. या बैठकीत तेलाचे उत्पादन कमी करण्याचा निर्णय झाल्यास त्याचा फटका सर्वसामान्य तेल ग्राहकांना होऊ शकतो.

काही दिवसांपूर्वी पेट्रोल-डिझेलच्या दरात उच्चांक गाठला होता. ऑक्टोबर महिन्याच्या उत्तरार्धात या दरांमध्ये हळूहळू घट होऊ लागली. एका ताज्या अहवालाने दिलेल्या माहितीनुसार पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये सध्या समतोल असल्याचे म्हटले आहे. परंतु, तेलाच्या दरात समतोल जास्त दिवस टिकेल, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. त्यामागील कारणही अगदी तसेच आहे. तेल निर्यातदार देशांच्या संघटनेची (ओपेक) ६ डिसेंबरला बैठक होणार आहे. या बैठकीत तेलाचे उत्पादन कमी करण्याचा निर्णय झाल्यास त्याचा फटका सर्वसामान्य तेल ग्राहकांना होऊ शकतो.

हेही वाचा – पेट्रोल-डिझेल अजून स्वस्त होणार?

- Advertisement -

म्हणून तेलाचे दर वाढू शकतात

काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलचा दर कमी झाले. ऑक्टोबर महिन्यात तेलाचे दर ८७ डॉलर प्रती बॅरल होता. तो दर आता ६० डॉलरपर्यंत आला आहे. २०१५ पासून कच्चा तेलाच्या किमती पहिंल्यादाच एवढ्या कमी झाल्या. परंतु, हे दर फार काळ टिकणार नाही, असे दिसत आहे. अमेरिकेने सौदी अरेबियाला अतिरिक्त तेलाचे पुरवठा करण्याचे सांगितले होते. त्यानुसार सौदी अरेबियाने पुरवठा केला. परंतु, तेल उत्पादकांनी उत्पादन आणखी कमी करावे, अशी इच्छा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची आहे. त्यामुळे येत्या ६ डिसेंबरच्या ओपेकच्या बैठकीत तेलाचे दर वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


हेही वाचा – इंधन दर वाढीवरून जनता भडकली, १०० जखमी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -