घरदेश-विदेशPetrol Price : केजरीवाल सरकारचा मोठा निर्णय: दिल्लीत पेट्रोल ८ रुपयांनी स्वस्त

Petrol Price : केजरीवाल सरकारचा मोठा निर्णय: दिल्लीत पेट्रोल ८ रुपयांनी स्वस्त

Subscribe

दिल्लीच्या केजरीवाल सरकराने आज कॅबिनेटमध्ये मोठा निर्णय घेतला आहे. दिल्ली सरकारने पेट्रोलवरील व्हॅट कमी केल्याने आत्ता दिल्लीकरांना पेट्रोल ८ रुपये स्वस्त दराने खरेदी करता येणार आहे. सरकारने पेट्रोलवरील व्हॅट ३० टक्क्यांवरून १९.४० टक्के केला आहे. त्यामुळे पेट्रोलचे दर प्रतिलिटर ८ रुपयांनी स्वस्त होणार आहे. दिल्लीत हे नवे दर आज मध्यरात्री १२ वाजल्यापासून लागू होतील.

यामुळे दिल्लीत पेट्रोलचे दर प्रतिलिटर १०० रुपयांहून कमी झाला आहे. दिल्लीकरांना उद्यापासून ९५.९७ रुपयांना खरेदी करता येणार आहे. दिल्लीत इंडियन ऑइलच्या पंपावर बुधवारी पेट्रोलचे दर १०३.९७ रुपये आहे.

- Advertisement -

 यापूर्वी राजस्थान, पंजाब आणि छत्तीसगडमध्येही पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी करण्यात आला. त्यानंतर आत्ता दिल्ली सरकारनेही व्हॅट कमी करण्याचा निर्णय घेतला. केंद्र सरकारने दिवाळीच्या मुहूर्तावर म्हणजे ४ नोव्हेंबरपासून पेट्रोल-डिझेलवरील अनेक कर कपात करण्याची घोषणा केली. यानंतरचं देशातील जवळपास २५ हून अधिक राज्यांनी व्हॅट कमी केला. केंद्राने पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर ५ रुपये तर डिझेलच्या दरात १० रुपयांची कपात केली.

मात्र पंजाब, राजस्थान, छत्तीसगडप्रमाणे महाराष्ट्रात व्हॅट कमी करण्याचा निर्णय का घेतला जात नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. महाराष्ट्रातील मुंबई शहरात आजही पेट्रोल १०९ रुपयांवर पोहचले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिक पेट्रोल -डिझेलचे भाव कमी करावे अशी मागणी राज्य सरकारकडे करत आहेत.

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -