घरदेश-विदेशरेल्वे प्रवाशांना दिलासा! 'या' मार्गांवर धावणार १३० किमी वेगाने रेल्वे!

रेल्वे प्रवाशांना दिलासा! ‘या’ मार्गांवर धावणार १३० किमी वेगाने रेल्वे!

Subscribe

प्रवासादरम्यान प्रत्येक मार्गावर लागणारा १० ते ३० मिनिटांचा वेळ प्रवाशांचा वाचणार आहे

रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांच्या नेतृत्वात भारतीय रेल्वे प्रवासी गाड्यांच्या वेगाकडे विशेष लक्ष देत आहे. मार्च २०२१ पर्यंत १०,००० कि.मी. मार्गावर अंतर्भूत गाड्यांची ताशी १३० किमी पर्यंत वाढली आहे. गोल्डन क्वाडिलेटरल/ डायगोनल्सच्या ९ हजार ८९३ किलोमीटरचा मार्ग १३० किमी / तासाच्या वेगात अपग्रेड केला जाणार आहे. तर आतापर्यंत, १ हजार ४४२ मार्गांवर धावणाऱ्या गाड्यांचा वेग १३० किमी / ताशी वाढविण्यात आला आहे. अशाप्रकारे, गोल्डन क्वाड्रिलेट्रल/ डायगोनल्स मार्गावरील १५ टक्के गाड्यांचा वेग ताशी १३० किलोमीटर पर्यंत अपग्रेड करण्यात आला आहे.

अलीकडे, दक्षिण मध्य रेल्वे अंतर्गत ताशी १३० किमी वेगाने येणाऱ्या चेन्नई-मुंबई मार्गावर गाड्यांची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. आतापर्यंत राजधानी आणि शताब्दी गाड्या याच वेगाने धावत आहे. हा मार्ग रेल्वेच्या गुंटकल विभागाअंतर्गत असल्याचे सांगितले जात आहे.  या मार्गावर ८० टक्क्यांहून अधिक जास्त गाड्यांचा वेग हा १३० किमी ताशीच्या वेगाने असून त्यांची चाचणी यशस्वी झाली होती. हा मार्ग गोल्डन क्वाड्रिलेट्रलच्या अंतर्गत येत असून तो चेन्नई-मुंबई दिल्ली कोलकत्ता-चेन्नईपर्यंत आहे. या संपुर्ण मार्गांची लांबी ९ हजार ८९३ किमी आहे. या मार्गावरील वेग १३० किमी ताशीच्या वेगाने करण्याची रेल्वेची तयारी आहे.

- Advertisement -

प्रवाशांचा वेळ वाचणार

रेल्वेने मिशन रफ्तार अंतर्गत रेल्वेगाड्यांना लागणारा वेळ सुधारण्यासाठी तयारी सुरू केली आहे. त्याअंतर्गत २४ कोचसह गाड्या १३० किमी / ताशीच्या वेगाने धावणार आहेत. यासाठी शुक्रवारपासून उत्तर रेल्वे तीन दिवस या योजनेची चाचणी देखील घेणार आहे. रेल्वे अधिकाऱ्यांच्या मते, प्रवासादरम्यान प्रत्येक मार्गावर लागणारा १० ते ३० मिनिटांचा वेळ प्रवाशांचा वाचणार आहे.

या चाचणी दरम्यान याची तपासणी केला जाणार आहे की, जर २४ कोचसह ताशी १३० किमी वेगाने ट्रेन चालविली गेली तर ट्रॅकमध्ये कोणत्या प्रकारचे कंपन होईल आणि याची कोणतीही अडचण तर येणार नाही. या चाचणीनंतर या मार्गांवर २४ कोच असणार्‍या गाड्या १३० किमी / तासाच्या वेगाने चालवता येतील का? हे निश्चित केले जाणार आहे.


Indian Railways मध्ये होणार सर्वात मोठा बदल; ४२ महिन्यांत रचणार विक्रम!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -