घरदेश-विदेशपंतप्रधान मोदी म्हणजे आधुनिक भारताचे स्वामी विवेकानंद, भाजपा खासदारांकडून कौतुक

पंतप्रधान मोदी म्हणजे आधुनिक भारताचे स्वामी विवेकानंद, भाजपा खासदारांकडून कौतुक

Subscribe

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे जगातील सर्वात लोकप्रिय नेते (Most Popular World Leaders) असल्याचे विविध सर्वेक्षणातून समोर आले आहे. त्या अनुषंगाने पंतप्रधान मोदी यांची प्रशंसा करताना भाजपा नेत्यांकडून त्यांची तुलना विविध महापुरुषांशी केली जाते. भाजपा खासदार सौमित्र खान हे देखील त्यापैकीच एक आहेत. त्यांनी नरेंद्र मोदी म्हणजे आधुनिक भारताचे स्वामी विवेकानंद म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याने प्रभावित होऊन अनेक भाजपा नेत्यांनी त्यांची तुलना विविध महापुरुषांशी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचा 11वा अवतार असल्याचे भाजपा नेते अवधूत वाघ यांनी म्हटले होते. तर, भाजपा नेते यांनी ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ असे पुस्तक लिहिले होते. पण तीव्र विरोधानंतर त्यांन हे पुस्तक मागे घ्यावे लागले. आता भाजपा खासदार सौमित्र खान यांनी पंतप्रधान मोदी आधुनिक भारताचे स्वामी विवेकानंद असल्याचे म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले संपूर्ण आयुष्य देशसेवेत घालवले आहे, त्यामुळेच त्यांना आधुनिक भारताचे विवेकानंद म्हटले तर चुकीचे ठरणार नाही, असा युक्तिवाद त्यांनी केला आहे.

- Advertisement -

सौमित्र खान हे पश्चिम बंगालमधील बांकुरा येथील खासदार आहेत. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जन्म स्वामी विवेकानंदांच्या नव्या रूपात झाला आहे. स्वामीजी हे आपल्यासाठी देवासारखे आहेत, तर दुसरीकडे पंतप्रधानांनी आपले आयुष्य देशसेवेत घालवले आहे. पंतप्रधान मोदी हे आधुनिक भारताचे नवे रूप आहे असे मला वाटत असल्याचे ते म्हणाले.

राष्ट्रीय युवा दिनानिमित्त राज्यभर विविध कार्यक्रम
स्वामी विवेकानंद यांचे तत्वज्ञान तसेच ते ज्या आदर्शांसाठी जगले ते आदर्श सर्वांसाठी प्रेरणादायी ठरू शकतात हे लक्षात घेऊन दरवर्षी 12 जानेवारी हा त्यांचा जन्मदिन राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो. पुण्यातील केंद्रीय संचार ब्युरो (महाराष्ट्र- गोवा) आणि त्या अंतर्गत काम करणाऱ्या महाराष्ट्र व गोवा राज्यातील 11 कार्यालयांतर्फे यानिमित्त विविध लोकसंपर्क उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

- Advertisement -

नेहरू युवा केंद्र आणि डेक्कन कॉलेज, पुणे यांच्यासह आज डेक्कन कॉलेज येथे स्वामी विवेकानंद यांच्या जीवन अभ्यासक, रामकृष्ण मिशन सांस्कृतिक संस्था, कोलकाता येथील विदुषी डॉ. सुरूची पांडे यांच्या व्याख्यानचे आयोजन करण्यात आले होते. डेक्कन कॉलेजचे कुलगुरू डॉ. प्रा. प्रमोद पांडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. नागपूर क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने दत्तवाडी येथील श्रीमती विमलताई तिडके विद्यालयात राष्ट्रीय युवा दिन साजरा करण्यात आला. यावेळी उपजिल्हाधिकारी पियुश चिवंडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच जनजागृती फेरी काढण्यात आली.

पणजी, गोवा येथील मिरामार समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता करण्यात आली. यावेळी 200 किलोपेक्षा अधिक प्लास्टिक गोळा करण्यात आले. याशिवाय केंद्रीय संचार ब्यूरोच्या लोककलावंतांनी राज्यभरात युवा दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -