घरदेश-विदेशरुपे कार्डद्वारे मोदींनी केली शॉपिंग

रुपे कार्डद्वारे मोदींनी केली शॉपिंग

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरात मधील एका कार्यक्रमात चादर विकत घेतली आहे. या चादरीचे पैसे त्यांनी रुपे कार्ड द्वारे भरले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तीन दिवसाच्या गुजरात दौऱ्यावर पोहोचले आहे. त्यांनी आज अहमदाबाद येथील बल्लभ भाई पटेल विज्ञान शोध संस्थेचे उदघाटन केले. या कार्यक्रमानंतर मोदींनी साबरमती रिवफ्रंट येथे आयोजित कार्यक्रमादरम्यान त्यांनी एक चादर विकत घेतली. या चादरीचे पेमेंट त्यांनी रुपे कार्डद्वारे केले आहे. नोटबंदीनंतर डिजिटल पेमेंटला नरेंद्र मोदींनी महत्व दिले आहे. पेमेंट करतेवेळी फक्त रुपे कार्डचा वापर करण्याचे आवाहन त्यांनी अनेकदा लोकांना केले आहे. यावेळी रुपे कार्डचा प्रचार करण्यासाठी त्यांनी ही शॉपिंग केली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हारल झाला आहे. सरकारने मागील चार वर्षात अनेकांना रोजगार दिला असल्याचे त्यांनी वक्तव्य केले.

सर्वात मोठा शॉपिंग फेस्टिवल

अहमदाबाद शॉपिंग फेस्टिवल हा गांधीनगर येथील हेलीपॅड मैदानावर आयोजित करण्यात आला आहे. हा अहमदाबाद येथील सर्वात मोठा शॉफिंग फेस्टिवल आहे. या फेस्टिवलमध्ये मॉलमध्ये मिळणाऱ्या सामानापासून ते रस्त्यावर मिळणारे सामान विकल्या जाते. यावेळी या फेस्टिवलमध्ये १२०० दुकाने सुरु करण्यात आले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -