घरदेश-विदेशपंतप्रधान मोदींच्या हस्ते आज पीएम किसान सन्मान निधीचं वाटप

पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज पीएम किसान सन्मान निधीचं वाटप

Subscribe

९ कोटी शेतकरी लाभार्थ्यांना १८ हजार कोटी रुपये थेट बँक खात्यात जमा होणार

माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांची आज ९६ वी जयंती आहे. याचे औचित्य साधून शेतकरी सन्मान निधीचे वाटप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. ऑनलाईन पद्धतीने होणाऱ्या कार्यक्रमात १ बटन दाबून ९ कोटी शेतकरी लाभार्थ्यांना १८ हजार कोटी रुपये थेट बँक खात्यात जमा होणार आहेत. यावेळी पंतप्रधान मोदी सहा राज्यातील शेतकऱ्यांसोबत संवाद साधणार आहेत. पीएम-किसान आणि शेतकरी कल्याणासाठीच्या सरकारच्या विविध उपक्रमाबाबत शेतकरी आपले अनुभव कथन करतील. केंद्रीय कृषी मंत्रीही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन सुरु असताना पंतप्रधान मोदी काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

केंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजना असलेल्या पीएम किसान योजनेचा या वर्षातील तिसरा हप्ता २५ डिसेंबर रोजी म्हणजेच आज शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. या आधीचे हप्ते हे कोरोना काळात जमा करण्यात आले होते. आता तिसरा हप्ता हा अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंती कार्यक्रमात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या दिवशी देशातील ९ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात १८ हजार कोटी रुपये जमा करण्यात येतील.

- Advertisement -

असा आहे भाजपचा कार्यक्रम

देशभरात आज १९,००० ठिकाणी कार्यक्रम होणार आहे. तीन हजाराहून अधिकचे कार्यक्रम केवळ उत्तर प्रदेशमध्ये होणार आहेत. १ कोटीहून अधिक कार्यक्रमाचे प्रत्यक्षदर्शी असतील, तर ५ कोटी शेतकरी कार्यक्रम ऐकणार आहेत. या कार्यक्रमात खासदार, आमदार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महापौर, उपमहापौर आदी उपस्थित असणार आहेत. भाजपचे पदाधिकारी देखील या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी भाजपच्या सर्व लोकसभा, राज्यसभेच्या खासदारांना, वरिष्ठ मंत्र्यांपासून प्रदेशाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष सर्वांना पक्ष पाठवले आहे. जेपी नड्डा यांनी पक्षात लिहिले आहे की, २५ डिसेंबर म्हणजेच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण देणार आहेत. त्यासाठी जिल्ह्यांमध्ये मोठी एलईडी स्क्रीन लावण्यासाठी सांगितले.

- Advertisement -

काय आहे पीएम किसान योजना?

पीएम किसान योजना अर्थात शेतकरी सन्मान नीधी योजना २०१९ पासून लागू करण्यात आली आहे. या अंतर्गत वर्षातून तीन वेळा प्रत्येकी दोन हजार म्हणजे एकूण सहा हजार इतकी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होते. आतापर्यंत ९६ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केल्याचा दावा केंद्र सरकार करत आहे. या योजनेचे वार्षिक बजेट हे ७५ हजार कोटी रुपये इतके आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -