घरताज्या घडामोडीपंतप्रधान नरेंद्र मोदी ठरले जगातिक सर्वाधिक लोकप्रिय नेते

पंतप्रधान नरेंद्र मोदी ठरले जगातिक सर्वाधिक लोकप्रिय नेते

Subscribe

लोकप्रियतेत जगभरातील राष्ट्रप्रमुखांना पिछाडीवर टाकत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते बनले आहेत. अमेरिकेच्या डेटा इंटेलिजन्स फर्म द मॉर्निंग कन्सल्टने या कंपनीने केलेल्या सर्वेक्षणात मोदी जगातील लोकप्रिय नेते असल्याचे उघडकीस आले आहे. नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिंग पिंग यांच्यासह जगातील 13 राष्ट्रप्रमुखांना पिछाडीवर टाकले आहे. मोदींची अ‍ॅप्रुव्हल रेटिंग 70 टक्के आहे.

जगातील महासत्ता समजल्या जाणार्‍या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना मोदींनी लोकप्रियतेत मागे टाकले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडनच नव्हे तर ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो, ब्रिटिश पंंतप्रधान बोरिस जॉन्सन आणि ब्राझिलचे राष्ट्रपती जेर बोल्सोनैरो यांनाही मोदींनी मागे टाकले आहे. या सर्व्हेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पाचव्या क्रमांकावरून सहाव्या तर ब्रिटिश पंतप्रधान आठव्या स्थानावरून 10व्या क्रमांकावर आले आहेत.

- Advertisement -

दोन दिवसांपूर्वीच म्हणजे 5 नोव्हेंबर रोजी हे सर्वेक्षण घेण्यात आले. त्यात मोदींनी लोकप्रियतेच्या बाबतीत जगभरातील अनेक राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना मागे टाकले. मोदींनी मॅक्सिकन राष्ट्रपती आंद्रे मॅन्युअल लोपेज ओब्राडोर, इटलीचे पंतप्रधान मारिओ द्राघी, जर्मनचे चान्सलर अँजेला मर्केल, अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन यांनाही मोदींनी लोकप्रियतेत मागे टाकले आहे.

मे 2020 मध्ये मोदींची लोकप्रियता शिगेला पोहोचली होती. त्यावेळी मोदींची अ‍ॅप्रुव्हल रेटिंग 84 टक्के होती. त्यावेळी भारत कोरोनाच्या संकटातून बाहेर पडत होता. त्याच वर्षी जूनमधील अ‍ॅप्रुव्हल रेटिंगच्या तुलनेत यावेळची मोदींची अ‍ॅप्रुव्हल रेटिंग चांगली आहे. जूनमध्ये मोदींची अ‍ॅप्रुव्हल रेटिंग 66 टक्के होती. मोदींच्या डिसअ‍ॅप्रुव्हल रेटिंगमध्येही घसरण झाली आहे. ही घसरण 25 टक्के आहे.

- Advertisement -

द मॉर्निंग कन्सल्ट अ‍ॅप्रुव्हल आणि डिसअ‍ॅप्रुव्हल रेटिंग 7 दिवसात मुव्हिंग अ‍ॅव्हरेजच्या आधारे काढली जाते. या कॅलक्युलेशनध्ये 1 ते 3 टक्क्यांपर्यंत प्लस-मायनस मार्जिन असते. म्हणजे अ‍ॅप्रुव्हल आणि डिसअ‍ॅप्रुव्हल रेटिंगमध्ये 1 ते 3 टक्क्यांपर्यंत वाढ किंवा घसरण होऊ शकते. ही रेटिंग काढण्यासाठी मॉर्निंग कन्सल्टने भारतात सुमारे 2126 लोकांची ऑनलाईन मुलाखत घेतली होती.

कर्मठ आणि प्रामाणिक नेता

पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील लोकप्रिय नेते ठरल्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विट करून आनंद व्यक्त केला आहे. मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते ठरले आहेत. जनसामान्यांमध्ये त्यांच्याबाबत असलेला विश्वास यातून अधोरेखित होतो. एक कर्मठ आणि प्रामाणिक नेता म्हणून त्यांची प्रतिमा विश्वासार्ह आणि लोकप्रिय ठरत आहे, असे राजनाथ सिंह म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -