घरताज्या घडामोडीमहामारी भारतीयांच्या आकांक्षांवर परिणाम करू शकणार नाही - पंतप्रधान मोदी

महामारी भारतीयांच्या आकांक्षांवर परिणाम करू शकणार नाही – पंतप्रधान मोदी

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी यूएस-इंडिया स्ट्रॅटेजिक अँड पार्टनरशिप फोरम (USISPF) च्या तिसर्‍या परिषदेला संबोधित केलं. व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आपल्या भाषणात पंतप्रधान म्हणाले की, कोरोना महामारी येईल असं कोणालाही वाटलं नव्हतं. त्याचा परिणाम प्रत्येकावर झाला परंतु त्याचा परिणाम भारतीय लोकांच्या आकांक्षांवर होऊ शकला नाही. एकीकडे कोरोनाचं संकट असताना दुसरीकडे भारताने २ चक्रीवादळासारख्या नैसर्गिक संकटांचाही सामना केला आहे. सध्या भारतात ८० कोटी जनतेला मोफत धान्य पुरवलं जात आहे. तसंच ८० दशलक्ष लोकांना मोफत स्वयंपाकाचा गॅसही दिला जात असल्याचं मोदी म्हणाले.

पंतप्रधान म्हणाले की कोरोना साथीने बर्‍याच गोष्टींवर परिणाम झाला आहे, परंतु याचा परिणाम भारतीय लोकांच्या आकांक्षांवर झाला नाही. अलिकडच्या काही महिन्यांत बर्‍याच सुधारणा केल्या आहेत. जगातील सर्वात मोठ्या गृहनिर्माण उपक्रमावर काम चालू आहे. रेल्वे, रस्ते आणि हवाई संपर्क वाढविण्यात येत आहे. पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात बरीच कामं केली जात आहेत. आम्ही लोकांना बँकिंग, क्रेडिट, डिजिटल पेमेंट आणि विमा सुविधा प्रदान करण्यासाठी सर्वोत्तम आर्थिक तंत्रज्ञान वापरत आहोत. आमची करप्रणाली पारदर्शक असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

- Advertisement -

२०१९ मध्ये भारतात FDI मध्ये २० टक्क्यांनी वाढ

पंतप्रधान मोदी आपल्या भाषणात म्हणाले की, १.३ अब्ज भारतीय आत्मनिर्भर भारताच्या ध्येयात मग्न आहेत. आत्मनिर्भर भारताचे उद्दीष्ट आहे की ते जागतिक स्तरावर उत्पादन केंद्र बनतील. भविष्यातील रस्ता सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील अनेक संधींनी भरलेला आहे. त्यात मुख्य आर्थिक क्षेत्र आणि सामाजिक क्षेत्राचा समावेश आहे. अलीकडेच रेल्वे, संरक्षण, अवकाश आणि अणु उर्जा ही क्षेत्रे उघडली गेली आहेत. २०१९ मध्ये भारतातील एफडीआयमध्ये २० टक्क्यांनी वाढ झाली आहे, अशा वेळी जगात यामध्ये घसरण झाली आहे. हे आमच्या एफडीआय योजनेचं यश आहे.

पीपीई किट बनविण्यात भारताचा दुसरा क्रमांक

भारतातील कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर वेगाने वाढत आहे. आमचा व्यवसाय समुदायही चांगलं काम करत आहे. आम्ही सध्या पीपीई किट्सची जगातील सर्वात मोठी उत्पादक कंपनी आहोत. गेल्या काही महिन्यांत कोरोना व्यतिरिक्त भारतामध्येही २-२ चक्रीवादळ, पूर आणि टोळांचा हल्ला झाला आहे. भारतात ८० कोटी लोकांना मोफत धान्य दिलं जात आहे. ८ कोटी लोकांना मोफत स्वयंपाक गॅस दिला जात आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -