घरदेश-विदेशLive update - पंतप्रधानांच्या हस्ते स्टॅच्यू ऑफ युनिटीचे लोकार्पण

Live update – पंतप्रधानांच्या हस्ते स्टॅच्यू ऑफ युनिटीचे लोकार्पण

Subscribe

स्टॅच्यू ऑफ युनिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावर झाले.

स्टॅच्यू ऑफ युनिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झाले. गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यात १८२ मीटर उंचीच्या या पुतळ्याचा लोकार्पण सोहळा सुरु आहे. या कार्यक्रमाला अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, तसेच अनेक नेते उपस्थित आहेत.

- Advertisement -

पुतळ्यासाठी २,९८९ कोटींचा खर्च

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १८२ मीटर उंचीच्या या पुतळ्याचे काम २०१३ साली मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना सुरू झाले होते. या पुतळ्यासाठी २,९८९ कोटींचा खर्च करण्यात आला आहे. लॉर्सन अॅन्ड टुब्रो आणि राज्य सरकार संचालित सरदार सरोवर नर्मदा निगम लिमिटेडवर पुतळा उभारणीची जबाबदारी होती. हा पुतळा जगातील सर्वात उंच पुतळा मानला जातो. पुतळ्याची उंची ही न्यूयॉर्कच्या स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या जवळपास दुप्पट आहे. तसेच चीनमधील गौतम बुद्धांच्या स्प्रिंग टेंपल येथील पुतळ्यापेक्षाही उंच आहे.

- Advertisement -

लोकार्पणाचा अधिकार मिळाले हे माझे भाग्य

भारतीयांसाठी आजचा दिवस महत्त्वाच आहे. सरदार पटेल यांचा जगातील सर्वात उंच पुतळा आहे. माझं सौभाग्य आहे की या पुतळ्याचे लोकार्पण करण्याचा अधिकार मला मिळाला. हे पुण्य काम करण्याची संधी मला मिळेल असं मला वाटलं सुध्दा नव्हते. गुजरातच्या लोकांनी जे अभिनंदन पत्र दिले आहे त्यासाठी मी गुरजारच्या जनतेचे आभार व्यक्त करतो. ज्या मातीमध्ये वाढलो आहे, ज्यांच्यामध्ये संस्कार मिळाले आणि आई आपल्या मुलाच्या पाठीवर हात ठेवते तेव्हा ताकद, उत्साह हजारो पटीने वाढतो. आज गुजरातच्या जनतेच्या सम्मान पत्रातून मला ही ताकद मिळाली आहे.

सर्वाच्या सहकार्यातून पुतळा उभा राहिला

आजाचा दिवस इतिहासात कोणीच मिटवू शकत नाही. देशभरातील गावातू आणि शेतकऱ्यांकडून माती मागितली गेली होती. तसंच शेतकऱ्यांचे अवजारे गोळा करण्याचे काम सुरु होते. या सर्वांच्या सहकार्यातून हा पुतळा उभा राहिला आहे. निराशेच्या वेळेला सरदार पटेल आशेचा किरण बनले. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एका आवाहनावर देशभरातील शेकडो राजवाड्यांनी त्यागाची मशाल कायम ठेवली होती. आपल्याला या त्यागाला नाही विसरले पाहिजे.

आदिवसींना रोजगार मिळणार 

सरदार पटेल यांनी एक भारत श्रेष्ठ भारत हा मंत्र दिला होता. महिलांना पुढे आणण्यासाठी सरदार पटेल यांची महत्वपूर्ण भूमिको होती. पटेल यांनी खेडा ते बडोलीपर्यंत शेतकऱ्यांच्या शोषणासाठी आवाज नाही उठवला तर सत्याग्रह केला होता. ही मूर्ती सरदार पटेल यांचा पूतळा देशासाठी सामर्थ्य आणि समर्पनाचे प्रतिक आहे. या पुतळ्यामुळे आदिवासी बांधवांना यातून रोजगार मिळणार आहे. सरदार नसते तर सोमनाथ मंदिर आणि चारमिनार पहायला मिळाला नसता. हे ठिकाण आता पर्यटन स्थळ बनले आहे. इथल्या लोकांच्या जीवनाला हे पर्यटन स्थळ बदलणार आहे. येत्या काळात या ठिकाणाची एक नवी ओळख होणार आहे.

पटेलांच्या योगदानामुळे भारत उभा राहिला

सरदार वल्लभभाई पटेल यांचे राजकारणात महत्वपूर्ण योगदान राहिले. सरदार पटेल यांच्या योगदानामुळे भारत उभा राहिला. ही मूर्ती शेतकऱ्यांच्या स्वाभिमानाचे प्रतिक आहे. भारताने मोठा इतिहास रचला आहे. संपूर्ण देशात राष्ट्रीय एकात्मता दिवस साजरा होताय. देशात काही लोक विनाकारण राजकारण करत आहेत. प्रत्येक गावात विविध योजना, रस्ते, वीज, गॅस, पाण्याच्या सोयी सुविधा देण्याचे काम सुरु आहे. सरदारांच्या संस्कारांना पवित्रतासोबत येणाऱ्या पिढीला देणार असल्याचा पण आपण सर्व करुया.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -