घरदेश-विदेशदेशात कोरोनाचा पुन्हा उद्रेक होण्याची शक्यता - पंतप्रधान

देशात कोरोनाचा पुन्हा उद्रेक होण्याची शक्यता – पंतप्रधान

Subscribe

देशभरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असून कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता पुन्हा एकदा वर्तवली जात आहे. त्यामुळे कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशातील सर्वाधिक कोरोना रुग्णांची संख्या असलेल्या आठ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी त्यांनी भारतात पुन्हा एकदा कोरोना व्हायरसचा धोका वाढला असून पुन्हा कोरोनाचा उद्रेक होणार असल्याची चिंता व्यक्त केली आहे.

यासह पंतप्रधान मोदींनी कोरोना व्हायरसवर येणाऱ्या लसी संदर्भात चर्चा केली. आपल्या भाषणात कोरोना लशीच्या वितरणाबाबत राज्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या. कोरोना लशीच्या वितरणासाठी आपल्याला आतापासूनच कामाला लागले पाहिजे. त्यासाठी राज्यांनी प्रादेशिक स्तरावर स्टेअरिंग कमिटीपासून बुथ स्तरापर्यंत यंत्रणा उभारायला हवी. राज्यांनी या सगळ्याचा तपशील केंद्र सरकारकडे पाठवावा. कोरोना लशीच्या उपलब्धतेविषयी केंद्रांकडून राज्यांना वेळोवेळी सूचना दिल्या जात असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

- Advertisement -

भारतात येणारी कोरोनाची लस ही अधिक सुरक्षित असेल आसा देखील त्यांनी विश्वास व्यक्त केला. कोरोनाचा प्रादुर्भाव असला तरी कोरोनाशी एकजुटीने आपल्याला लढायला हवं असे त्यांनी सांगितले आहे. कोरोनाची लस देशात उपलब्ध झाली नाही. तसेच कोरोना लसीची किंमत देखील अद्याप निश्चित झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांसह झालेल्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, प्रत्येक नागरिकाची कोरोनाशी लढत सुरू आहे. देशात कोरोनाच्या टेस्टिंगचे नेटवर्क कार्यरत असून देशातील वैद्यकीय महाविद्यालये आणि जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन पुरवठा देण्याचे कार्य सुरू आहे.

पंतप्रधानांनी आपल्या भाषणात सांगितले की, आपल्या देशात आता कोरोना बाधितांचा आकडा पुरेसा आहे. मात्र प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असून अशा परिस्थितीत कोरोनावर नियंत्रण मिळवण्याची तयारी पूर्ण करावी लागेल. सुरुवातीला लोकांच्या मनात कोरोनाची भीती होती, मग भीतीने लोकही आत्महत्या करीत होते. त्यानंतर लोक एकमेकांकडे संशयाने पाहत आहेत. पंतप्रधान म्हणाले की, आता लोकं कोरोनाला गंभीर्याने घेत आहेत. तर काही लोकं अद्यापही कोरोना व्हायरसला तितकसं गांभीर्याने घेत नसल्याने यावेळी त्यांनी चिंता व्यक्त केली आहे.

- Advertisement -

मोदींनी केले लसी संदर्भात महत्त्वाचे विधान

देशातील काही भागात करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याची दखल घेतानाच भारत चांगल्या स्थितीत असल्याचे मोदी बैठकीनंतर म्हणाले. “करोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आणि मृत्यूदर याबाबतीत भारत दुसऱ्या देशाच्या तुलनेत चांगल्या स्थितीमध्ये आहे. हे सर्व एकत्रित प्रयत्नांमुळे शक्य झाले” असे मोदी या बैठकीत म्हणाले. लस हाच यातून बाहेर पडण्याचा मार्ग आहे. भारत जी कुठली लस आपल्या नागरिकांना देईल, ती वैज्ञानिक दृष्टीने पूर्णपणे सुरक्षित असली पाहिजे. वेगाइतकीच सुरक्षितता सुद्धा महत्त्वाची आहे. राज्यांबरोबर समन्वय साधून लस वितरणाची रणनिती ठरवली जाईल, यासह शीतगृह कोल्ड स्टोअरेजसाठी राज्यांनी आतापासूनच काम सुरु करावे, असे त्यांनी सांगितले.

लस सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्लान लवकरात लवकर पाठवा, अशी त्यांनी सर्व राज्यांना विनंती केली. लशीचे काम सुरु आहे. पण त्यात जरापण निष्काळजीपणा करु नका, अशी मी आपल्याला विनंती करतो असे मोदी म्हणाले.


ईडी, सीबीआय हे भाजपचे बाहुले – छगन भुजबळ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -