घरताज्या घडामोडीLata Mangeshkar: लतादीदींचा आवाज नेहमी आपल्यासोबत राहिल - पंतप्रधान नरेंद्र मोदी

Lata Mangeshkar: लतादीदींचा आवाज नेहमी आपल्यासोबत राहिल – पंतप्रधान नरेंद्र मोदी

Subscribe

गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाईव्ह येऊन लतादीदींना श्रद्धांजली वाहिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ‘माझ्यासारखे अनेक लोक गर्वाने म्हणतील की, आमचे लतादीदींसोबत खूप जवळचे नाते आहे. तुम्ही कुठेही जा, तुम्हाला त्यांच्यावर प्रेम करणारे लोकं भेटतील. त्यांचा मनमोहक आवाज नेहमीच आपल्यासोबत राहिली. मी त्यांना श्रद्धांजली अर्पित करतो.’

- Advertisement -

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी लतादीदींचे अंत्यदर्शन घेण्यासाठी दुपारी दिल्लीहून मुंबईकडे रवाना झाले होते. आता ते मुंबईत दाखल झाले असून त्यांच्या स्वागतासाठी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे विमानतळावर दाखल झाले आहेत. संध्याकाळी सहा वाजेपर्यंत पंतप्रधान मोदी लतादीदींच्या अंत्यदर्शनासाठी शिवाजी पार्कमध्ये पोहोचणार असल्याचे मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी सांगितले. आता लतादीदींचे पार्थिव शिवाजी पार्ककडे रवाना झाले आहे. त्यांना शेवटचा निरोप देण्यासाठी चाहत्यांची गर्दी केली आहे.

लतादीदींच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्वीट करून म्हणाले होते की, ‘शब्दांमध्ये मला व्यक्त होता येणार नाही. आपल्याला लतादीदी सोडून गेल्या. त्यांच्या जाण्याने आपल्या देशात एक पोकळी निर्माण झाली असून जी कुणीही भरुन काढू शकत नाही. भारतीय संस्कृतीमधील एक दिग्गज म्हणून येणारी पिढी ही त्यांना स्मरणात ठेवतील. लता मंगेशकर यांच्या मधुर आवाजात लोकांना मंत्रमुग्ध करण्याची अतुलनीय क्षमता होती. लतादीदींच्या निधनाने मोठी पोकळी निर्माण झालीय. ती पोकळी भरून काढता येणार नाही.’

- Advertisement -

हेही वाचा – Lata Mangeshkar : लता मंगेशकर यांच्या निधनाने राज्यात एक दिवसाची सार्वजनिक सुट्टी जाहीर, अधिसूचना जारी


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -