घरक्रीडाIND vs WI : वनडे मालिकेत युझवेंद्र चहलची सेंच्युरी, टीम इंडियाच्या १०००...

IND vs WI : वनडे मालिकेत युझवेंद्र चहलची सेंच्युरी, टीम इंडियाच्या १००० व्या सामन्यात चहलची कमाल

Subscribe

टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात वनडे मालिकेचा पहिला सामना सुरू आहे. हा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जात आहे. तसेच टीम इंडियाचा हा १००० वा सामना असणार आहे. या सामन्यात टीम इंडियाचा फिरकीपटू युझवेंद्र चहलने सेंन्चुरी पूर्ण केली आहे. वनडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० विकेट्स घेण्याचा रेकॉर्ड चहलने केलाय.

युझवेंद्र चहलने वेस्ट इंडिजच्या सामन्यात २० वी ओव्हर पूर्ण केली. यामध्ये त्याच्या या सामन्याची पहिली ओव्हर होती. युझवेंद्र चहलने आपल्या पहिल्या ओव्हरमध्ये दोन गडींना बाद केलं आहे. ३१ वर्षीय चहलला वनडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० विकेट्स पटकावले आहेत. वेस्ट इंडिजचा कर्णधार कायरन पोलार्डला त्याने क्लीन बोल्ड केलं. पोलार्डला चहरची गुगली न समजल्यामुळे पोलार्डची दांडी उडाली.

- Advertisement -

चहलने ६० व्या वनडे आंतराराष्ट्रीय सामन्यात १०० विकेट्सचा आकडा पार केलाय. यामध्ये मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव आणि इरफान पठान यांच्यापेक्षा जलद वेगाने त्याने १०० गडी बाद करत सेंच्युरी गाठली आहे. ५६ सामन्यात शमी, ५७ सामन्यात बुमराह, ५८ सामन्यात कुलदीप आणि ५९ सामन्यांमध्ये पठानने कमाल केली आहे.

- Advertisement -

१०० वनडे आंतरराष्ट्रीय विकेट्स

५६ सामने – मोहम्मद शमी
५७ सामने – जसप्रीत बुमराह
५८ सामने – कुलदीप यादव
५९ सामने – इरफान पठाण
६० सामने – युझवेंद्र चहल


हेही वाचा : Suresh Raina’s father passes away : भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाला पितृशोक


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -