घरताज्या घडामोडीदेशातील महान व्यक्तींचे योगदान पुसण्याचा स्वातंत्र्यानंतर प्रयत्न झाला, मोदींचा कॉंग्रेसवर निशाणा

देशातील महान व्यक्तींचे योगदान पुसण्याचा स्वातंत्र्यानंतर प्रयत्न झाला, मोदींचा कॉंग्रेसवर निशाणा

Subscribe

ज्यांनी भारताच्या भूमीवर पहिल्यांदा स्वतंत्र सरकारची स्थापना केली, त्या आपल्या नेताजींचा भव्य पुतळा आज डिजिटल स्वरुपात इंडिया गेटजवळ स्थापित होत आहे. लवकरच या हॉलोग्राम पुतळ्याच्या स्थानावर ग्रॅनाईटचा भव्य पुतळा देखील बसवला जाणार आहे, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले. नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या इंडिया गेट येथील पुतळ्याचे लोकार्पण कार्यक्रमाच्या प्रसंगी ते बोलत होते.

पंतप्रधानांचा कॉंग्रेसवर निशाणा 

देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात लाखो देशवासीयांच्या तपस्येचा समावेश होता. पण देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या इतिहासाला मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला. स्वातंत्र्याच्या अनेक दशकानंतर आता या चुकांमध्ये डंके की चोट पर सुधारणा होत आहे, तसेच सुधारण्यात येत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले. स्वातंत्र्यानंतरही देशातील संस्कृती आणि संस्काराच्या सोबतच अनेक महान व्यक्तींच्या योगदान पुसून टाकण्याचे दुर्भाग्यपूर्ण असे काम केले गेले. पण स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवाचा संकल्प आहे की भारत आपली आणि आपल्या प्रेरणास्थानाची आठवण पुर्नजिवित करणार आहोत.

- Advertisement -

नेताजी सुभाष चंद्र बोस म्हणायचे, कधीही स्वतंत्र भारताच्या स्वप्नाचा विश्वास गमावू नका, दुनियेतील कोणतेही ताकद भारताला झुकवू शकणार नाही. आज आपल्यासमोर स्वतंत्र भारताच्या स्वप्नाला पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. भारताच्या स्वातंत्र्याच्या शंभराव्या वर्षाच्या आधीच भारताच्या निर्माणाचे आपले लक्ष्य आहे, असेही मोदींनी स्पष्ट केले.

- Advertisement -

महान स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125व्या जयंतीनिमित्त आणि वर्षभर चालणाऱ्या उत्सवांचा एक भाग म्हणून सरकारने इंडिया गेटवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा भव्य पुतळा बसवण्याचा निर्णय घेतला होता. हा पुतळा ग्रॅनाइटपासून बनवलेला असून स्वातंत्र्यलढ्यातील नेताजींच्या अतुलनीय योगदानाला अतिशय समर्पक अभिवादन ठरेल आणि त्यांच्याविषयीच्या देशाच्या कृतज्ञतेचे प्रतीक असेल. हा पुतळा तयार होईपर्यंत त्याच जागी नेताजींचा हॉलोग्राम पुतळा असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी 23 जानेवारी, 2022 रोजी संध्याकाळी सहा वाजता इंडिया गेट येथे नेताजींच्या हॉलोग्राम पुतळ्याचे अनावरण करतील. 30,000 लुमेन्सच्या 4के प्रोजेक्टरद्वारे हा हॉलोग्राम पुतळा दृश्यमान केला जाईल.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -