घरCORONA UPDATEMumbai Corona Update: मुंबईत 24 तासात कोरोना रुग्णसंख्येत घसरण, मृत्यू संख्येत वाढ

Mumbai Corona Update: मुंबईत 24 तासात कोरोना रुग्णसंख्येत घसरण, मृत्यू संख्येत वाढ

Subscribe

आज मुंबईत 13 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून काल हीच संख्या 10 इतकी होती. आतापर्यंतचा मृतांचा आकडा हा 16,535 वर पोहोचला आहे.

मुंबईत रविवारी कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याचे दिसून आले. शनिवार पेक्षा आज मुंबईतील कोरोना बाधित रुग्णसंख्येचा आलेख एक हजारांनी खाली घसरला. मुंबईत रविवारी मागील 24 तासात 2,550 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली असून काल हीच संख्या 3 हजारांहून अधिक होती. मात्र आज यात मोठी घसरण झाली आहे. मुंबईत आज एकूण 45,993 कोरोना चाचण्या करण्यात आल्या त्यातील 2,550 चाचण्या पॉझिटीव्ह आल्या आहेत. आज नोंद करण्यात आलेल्या कोरोना रुग्णांपैकी 337 रुग्ण उपचारांसाठी रुग्णालयात दाखल झाले असून 40 रुग्ण ऑक्सिजन बेडवर आहेत.


मुंबईतील मृत्यूचा आकडा आज 3 ने वाढला आहे. आज मुंबईत 13 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून काल हीच संख्या 10 इतकी होती. आतापर्यंतचा मृतांचा आकडा हा 16,535 वर पोहोचला आहे. मुंबईतील कोरोना रुग्णवाढीचा सध्याचा दर हा 96 टक्के इतका आहे. 16 जानेवारी ते 22जानेवारी पर्यंतचा विचार केला असता मुंबईत कोरोना रुग्ण वाढीचा दर हा 0.54टक्के आहे.

- Advertisement -

मुंबईत रविवारी एकूण 217 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 9,95,786 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईत सध्या 19,808 अँक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत. त्याचप्रमाणे मुंबईत सध्या सक्रीय कंटेनमेंट झोनची संख्या ही शून्य असून 24 सक्रीय सीलबंद इमारती आहेत.


हेही वाचा – दुर्घटनांसाठी जबाबदार मुंबई महापालिका व सरकारचा पर्दाफाश करणार – प्रवीण दरेकर

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -