घरदेश-विदेशपंतप्रधान मोदींनी महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्रींना वाहिली श्रद्धांजली

पंतप्रधान मोदींनी महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्रींना वाहिली श्रद्धांजली

Subscribe

आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची १५२ वी जयंती आहे. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी दिल्लीतील राज घाटावर बापूंना आदरांजली वाहिली. “राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना जयंतीदिनी विनम्र आदरांजली. पूज्य बापूंचे जीवन आणि आदर्श देशाच्या प्रत्येक पिढिला कर्तव्य मार्गांवर चालण्यासाठी प्रेरित करत राहतील,” असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

- Advertisement -

लालबहादुर शास्त्री यांना वाहिली आदरांजली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान श्री लालबहादुर शास्त्री यांना त्यांच्या जयंतीदिनी आदरांजली अर्पण केली आहे. “माजी पंतप्रधान लाल बहादुर शास्त्रीजी यांना त्यांच्या जयंतीदिनी शत-शत नमन. मूल्ये आणि सिद्धांतांवर आधारित त्यांचै जीवन देशवासीयांकरता नेहमीच प्रेरणास्रोत म्हणून कायम राहील,” असं मोदी म्हणाले.

- Advertisement -

पंतप्रधान मोदी आज अनेक योजनांचा शुभारंभ करणार आहेत. पंतप्रधान मोदी शनिवारी सकाळी ११ वाजता ग्रामपंचायत आणि पाणी समित्यांशी संवाद साधतील. त्याचवेळी, गांधी जयंतीला, मोदी व्यतिरिक्त, काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली.

गांधी जयंतीनिमित्त काँग्रेस आज दुपारी ३ वाजता चर्चासत्र आयोजित करेल. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या या परिसंवादाची थीम ‘गांधी हा केवळ भूतकाळच नाही तर भविष्यही आहे.’

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -