राजीव गांधींच्या रक्ताने माखलेली कॅप घालत पोलीस अधिकारी निवृत्त

prateep philip
राजीव गांधींच्या रक्ताने माखलेली कॅप घालत पोलीस अधिकारी निवृत्त

तमिळनाडूचे पोलीस महासंचालक प्रतिप फिलिप हे नुकतेच निवृत्त झाले. निवृत्तीच्या दिवशी त्यांनी रक्ताने माखलेली टोपी घातली होती. २१ मे १९९१ रोजी श्रीपेरबंदूरच्या आत्मघातकी हल्ल्यातील सर्वत्र उडालेले रक्ताचे डाग या टोपीवर होते. त्यावेळी एएसपी असलेले फिलिप हे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या निवडणूक सभेत व्यग्र होते. फिलिप त्यांच्यापासून काही फूट अंतरावर होते जेव्हा एका हल्लेखोराने स्वतःला उडवले होते. त्या हल्ल्यात अनेक जण जखमीही झाले होते. कांचीपुरममध्ये तेव्हा सहायक पोलीस अधीक्षक असलेले आयपीएस अधिकारी प्रतीप फिलिप यांचाही जखमींमध्ये समावेश होता.

प्रतीप फिलीप हे अधिकारी ३४ वर्षांच्या आपल्या सेवेनंतर निवृत्त झाले. पोलीस महासंचालक सिलेंड्रा बाबू यांच्या उपस्थितीत त्यांना निरोप देण्यात आला. या निरोप सोहळ्याला त्यांनी आपली कॅप आणि नावाचा बॅजही परिधान केला होता. प्रतीप फिलीप यांच्या बाबतीत त्या वस्तू महत्त्वाच्या होत्या, कारण त्यांच्याशी काही महत्त्वपूर्ण आठवणी त्या वस्तूंशी जोडल्या गेल्या होत्या.  फिलिप यांच्यासाठी हा प्रसंग जीवन बदलणारी घटना होती. या कारणामुळे त्यांनी स्वतःच्या सेवानिवृत्तीला ही टोपी आणि नेम प्लेट घालण्याचा विचार केला. दोन्ही पुरावे म्हणून सादर करण्यात आले. चेन्नईच्या न्यायालयाने त्यांना निवृत्तीच्या दोन दिवस आधी कॅप आणि बॅज सोबत ठेवण्याची परवानगी दिली होती.

द फ्री प्रेस जर्नलने दिलेल्या वृत्तानुसार, २१ मे १९९१ रोजी रात्री माजी पंतप्रधान राजीव गांधी श्रीपेरबंदूर येथे निवडणूक प्रचारासाठी आले होते. त्यावेळी मानवी बॉम्बने स्फोट घडवून आणून त्यांची हत्या केली. त्या हल्ल्यात अनेक जण जखमीही झाले होते. तपास यंत्रणेने स्फोटाच्या स्थळावरून पुराव्यांसाठी अनेक वस्तू जमा केल्या होत्या. यामध्ये फिलिप यांची रक्ताचे माखलेली कॅप आणि नावाचा बॅज यांचाही समावेश होता. ट्रायल कोर्टाच्या रेकॉर्डमध्ये या वस्तूंना ‘मटेरियल ऑब्जेक्ट्स नंबर ३८ अँड ३९ अशी नावे देण्यात आली होती.

या घटनेनंतर या दोन्ही वस्तू कोर्टाच्या ताब्यात होत्या. मात्र या वस्तूंशी प्रतीप फिलीपल यांचं भावनिक नातं असल्याने आपल्या सेवा निवृत्तीच्या कार्यक्रमाच्या दिवशी या वस्तू परिधान कराव्यात अशी त्यांची इच्छा होती. या इच्छेनुसार, अतिरिक्त सत्र न्यायालयात यासंदर्भात एक याचिका दाखल केली. यांदर्भात बाजू मांडली गेल्यानंतर राजीव गांधी यांच्या हत्या प्रकरणाचा निकाल देण्यात आला. कोर्टाच्या ताब्यात असलेली आपली कॅप आणि नेम बॅज परत मिळावा, यासाठी याचिकाकर्त्याने केलेल्या कायदेशीर आणि भावनिक मागणीवर, या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआयचा काही आक्षेप असू शकत नाही, असा युक्तिवाद वकिलांनी त्यांच्या अशिलाची बाजू मांडताना कोर्टात केला गेला. त्यानंतर न्यायाधीशांनी या वस्तू काही दिवसांपुरत्या प्रतीप फिलीप यांना देण्याचे आदेश दिले. १ लाख रुपयांच्या वैयक्तिक बाँडवर या वस्तू त्यांना परत देण्यात आल्या आणि राजीव गांधींच्या रक्ताने माखलेली कॅप घालत हे पोलीस अधिकारी निवृत्त झाले.


Jal Jeevan Mission: पंतप्रधान मोदी आज जल जीवन मिशन अ‍ॅप लाँच करणार