घरदेश-विदेशविजय मल्ल्याची संपत्ती जप्त होणार; कोर्टाने दिले आदेश!

विजय मल्ल्याची संपत्ती जप्त होणार; कोर्टाने दिले आदेश!

Subscribe

भारताच्या स्टेट बँक ऑफ इंडियाकडून (एसबीआय) ९००० कोटी रुपयांचे कर्ज घेऊन विदेशात पसार झालेला मद्यसम्राट विजय मल्ल्याला नवीन वर्षात पहिलाच धक्का बसला आहे. कारण कोर्टाने नववर्षाच्या सुरूवातीला विजय मल्ल्याची संपत्ती जप्त करण्याची पीएमएलएला कोर्टाने परवानगी दिली आहे. बँकेची छकीत रक्कम जमा करण्यासाठी कोर्टाने हे आदेश दिले आहेत.

- Advertisement -

ईडीने दिलेल्या माहितीनुसार मुंबईतील पीएमएलएल कोर्टाने कर्जबिडवणाऱ्या विजय मल्ल्याच्या प्रकरणावर सुनावणी करताना विजयमल्ल्याची संपत्ती जप्त करण्यास परवानगी दिली आहे. मात्र मल्ल्याला या निर्णयाविरोधात वरच्या कोर्टात अपली करता यावे यासाठी कोर्टाने १८ जानेवारीपर्यंत या निर्णयाच्या अंमलबजावणीस १८ जानेवारीपर्यंत स्थगिती दिली आहे.

कर्जबुडव्या विजय मल्ल्याविरोधात फसवणूक, मनी लॉन्ड्रिंग, फेमाचे उल्लंघन केल्याचे आरोप आहेत. मल्ल्याने भारतीय बँकांकडून ९००० कोटींची कर्ज घेतले होते. मल्ल्याच्या किंगफिशियर एअरलाईन्सने बँकांकडून कर्ज घेतले होते. विजय मल्ल्या २०१६ मध्ये भारत सोडून लंडनमध्ये पसार झाला. मुंबईचे विशेष न्यायालय (पीएमएलए) त्याला फरार घोषित केले होते. ईडीने आतापर्यंत विजय मल्ल्याच्या देश-विदेशातील संपत्ती जप्त केल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -