घरदेश-विदेशभारतात प्रत्यार्पण केल्यास मी आत्महत्या करेन - नीरव मोदी

भारतात प्रत्यार्पण केल्यास मी आत्महत्या करेन – नीरव मोदी

Subscribe

पीएनबी बँक घोटाळ्यातील आरोपी नीरव मोदीची जामीन याचिका लंडनमधील कोर्टाने पुन्हा एकदा फेटाळली. दरम्यान, नीरव मोदीने कोर्टासमोर जर भारताकडे आपले प्रत्यार्पण केले तर आपण आत्महत्या करू, अशी धमकी दिली आहे. आपल्याला तरूंगात अन्य कैद्यांकडून मारहाणदेखील करण्यात आल्याचे त्याने कोर्टाला सांगितले. यानंतरही कोर्टाने त्याची याचिका फेटाळून लावली आहे.

पंजाब नॅशनल बँकेत सुमारे २ अब्ज डॉलरचा घोटाळा आणि आर्थिक गैरव्यवहार केल्याच्या प्रकरणात, भारतात प्रत्यार्पणाची टांगती तलवार डोक्यावर असलेल्या नीरवला वेस्टमिन्स्टर मॅजिस्ट्रेट कोर्टात चीफ मॅजिस्ट्रेट एम्मा अर्बुथनॉट यांच्यापुढे हजर करण्यात आले. नीरव मोदी याने यापूर्वी कोर्टात २ दशलक्ष पौंडांची हमी सादर करण्याचा प्रस्ताव दिला होता, तो आता दुप्पट केला आहे. तसेच ज्याप्रमाणे संशयित दहशतवाद्यांना नजरकैदेत ठेवले जाते, त्याचप्रमाणे स्वत: नजरकैदेत राहण्याचीही त्याची तयारी आहे, असे त्याच्या वकिलांनी न्यायाधीशांना सांगितले. दरम्यान, नीरव मोदीला एप्रिल महिन्यात तसंच गेल्या मंगळवारी तरूंगात मारहाण करण्यात आल्याचेही त्याच्या वकीलाने कोर्टासमोर सांगितले.

- Advertisement -

नीरव मोदीवर मे २०२० मध्ये खटला चालणार आहे. त्यावेळी तो कोर्टात शरण येईल किंवा तो साक्षीदारांवर प्रभाव टाकणार नाही, याबाबत आपल्याला खात्री वाटत नाही, असे सांगून न्यायाधीशांनी त्याला जामीन नाकारला आहे. तसेच गेल्या सुनावणीच्यावेळी नीरव मोदीच्या मानसिक स्थितीबाबत गोपनीय वैद्यकीय अहवालात नमूद केलेली महिती माध्यमांपर्यंत पोहचल्याबाबत नाराजी व्यक्त करून, यापुढे असे घडू नये अशी तंबी त्यांनी दिली.

हेही वाचा –

मला युती तोडायची नाही, पण मुख्यमंत्री शिवसेनेचाच – उद्धव ठाकरे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -