घरमहाराष्ट्रमी महाराष्ट्रात येणार नाही; देवेंद्रच मुख्यमंत्री - नितीन गडकरी

मी महाराष्ट्रात येणार नाही; देवेंद्रच मुख्यमंत्री – नितीन गडकरी

Subscribe

महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेचा गेल्या १४ दिवसांपासून सुरु असलेला डेडलॉक आज सुटण्याची चिन्हे दिसत असून लवकरच शिवसेनेसोबत युतीचा तिढा सुटेल आणि देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्वाखाली राज्यात सरकार बनेल, असा दावा नितीन गडकरी यांनी आज केला.

‘मी केंद्रात खुश आहे, राज्यात येण्याचा प्रश्नच येत नाही. राज्यातील नेतृत्व बदलाच्या या केवळ अफवा असून भाजपचाच मुख्यमंत्री होईल’, असे केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी म्हणाले आहेत. सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भेटीसाटी नागपूरला आलेल्या गडकरी यांना विमानतळावरच प्रसारमाध्यमांनी गाठले असता त्यांनी ‘मला राज्यात पुन्हा यायचे नाही’, असे सांगितले. दरम्यान, थोड्या वेळापूर्वी वनमंत्री आणि भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी भाजप अल्प मतातील नाही तर स्थिर सरकार देईल आणि देवेंद्र फडणवीस यांच्याच रुपाने शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल असे म्हणत दोन्ही पक्षातील डायलॉग सुरु असल्याबद्दल दुजोरा दिला. तसेच आम्ही आज राज्यपालांना भेटून सत्ता स्थापनेचा दावा करणार नसून राज्यातील सध्याच्या परिस्थितीची माहिती राज्यपालांना अवगत करण्यासाठी जात असल्याचे सांगितले.

देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्वाखाली राज्यात सरकार बनेल – गडकरी

महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेचा गेल्या १४ दिवसांपासून सुरु असलेला डेडलॉक आज सुटण्याची चिन्हे दिसत असून लवकरच शिवसेनेसोबत युतीचा तिढा सुटेल आणि देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्वाखाली राज्यात सरकार बनेल, असा दावा नितीन गडकरी यांनी आज केला. ज्यांचे जास्त आमदार त्यांचाच मुख्यमंत्री या न्यायानुसार भाजपचाच मुख्यमंत्री होईल आणि विधीमंडळाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्वामध्ये राज्यात पुन्हा एकदा सरकार स्थापन होईल, अशी आशा गडकरी यांनी व्यक्त केली. सत्ता स्थापनेच्या निर्णयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कोणताही संबंध नाही आणि संघ कधीही भाजपला आदेश देत नसतो, असे गडकरी म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – स्थिर सरकारसाठीच भाजप आजपर्यंत थांबली – मुनगंटीवार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -